जानुबाई देवीची यात्रा साध्या पद्धतीने होणार साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:45 AM2021-03-01T04:45:48+5:302021-03-01T04:45:48+5:30

पुसेगाव : खटाव तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांचे दैवत असलेल्या राजापूर (ता. खटाव) येथील जागृत देवस्थान श्री जानुबाई देवीची यात्रा ...

The procession of Goddess Janubai will be celebrated in a simple manner | जानुबाई देवीची यात्रा साध्या पद्धतीने होणार साजरी

जानुबाई देवीची यात्रा साध्या पद्धतीने होणार साजरी

Next

पुसेगाव : खटाव तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांचे दैवत असलेल्या राजापूर (ता. खटाव) येथील जागृत देवस्थान श्री जानुबाई देवीची यात्रा होत असते. परंतु, आताच्या कोरोना संकटामुळे व शासनाच्या नियमानुसार यात्रा साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे.

राजापूर येथील व राजापूर परिसरातील व यात्रेनिमित्त राजापूरमध्ये परगावांहून येणाऱ्या व्यक्ती व पै-पाहुणे येत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्याने, प्रशासनाच्या आदेशानुसार यावर्षीची जानुबाई देवीची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे राजापूर गाव सोमवार, १ ते ३ रोजी अखेर पूर्णपणे बंद राहणार आहे. यामध्ये सर्व प्रकारची दुकाने, सर्व मंदिरे व विविध प्रकारच्या आस्थापना बंद राहणार आहेत. यादरम्यान यात्रेचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. त्यामुळे कोणालाही यात्रेनिमित्ताने गावामध्ये बोलवू नये, अशा प्रशासनाच्या सक्त सूचना आहेत. वरील बाबींचे कोणीही उल्लंघन केल्यास त्यांच्यावर प्रशासनामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घेण्यात यावी, असे आवाहन ग्रामस्तरीय कृती समितीने केले आहे.

Web Title: The procession of Goddess Janubai will be celebrated in a simple manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.