प्रथमच एक कोटी क्विंटल साखर उत्पादन- सातारा जिल्ह्यातील विक्रमी गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:38 PM2018-04-19T23:38:49+5:302018-04-19T23:38:49+5:30
वाठार स्टेशन : चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील एकूण १३ कारखान्यांनी आत्तापर्यंतच्या गाळपाच्या सीमा पार करत १८ एप्रिलअखेर ८६ लाख ७७ हजार २०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले.
संजय कदम ।
वाठार स्टेशन : चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील एकूण १३ कारखान्यांनी आत्तापर्यंतच्या गाळपाच्या सीमा पार करत १८ एप्रिलअखेर ८६ लाख ७७ हजार २०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. तर १ कोटी ३ लाख ७७ हजार ४०५ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार केला आहे. गाळप हंगाम घेतलेल्या एकूण साखर कारखान्यांपैकी जवळपास नऊ कारखान्यांचे गाळप उसाअभावी बंद झाले आहे. उर्वरित सर्वच कारखाने दि. २५ ते ३० एप्रिलअखेर बंद होतील, अशी माहिती साखर कारखानदारांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्याचा गाळप हंगाम यंदा दि. ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. जवळपास १५० ते १६० दिवसांच्या या हंगामात एकूण १४ कारखान्यांपैकी यंत्रणेअभावी प्रतापगड कारखाना सुरुवातीपासूनच बंद राहिला तर उर्वरित सर्व १३ कारखाने मार्च अखेरपर्यंत गाळपास सज्ज राहिले. दि. १८ एप्रिलअखेर जवळपास नऊ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. सह्याद्री कारखान्याने आतापर्यंत सर्वाधिक १२ लाख ५६ हजार ५०० मेट्रिक टन उसाचे गाळप करत १५ लाख ६२ हजार १९५ क्विंटल साखर उत्पादित केली. या कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक साखरनिर्मिती केली आहे. तर या पाठोपाठ कृष्णा सहकारी कारखान्याने ११ लाख ५७ हजार २५० टन उसाचे गाळप करत १४ लाख ७२ हजार २८० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. या कारखान्याचा साखर उतारा जिल्ह्यात सर्वाधिक १२.७२ एवढा राहिला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर जरंडेश्वर शुगर मिल्स हा कारखाना राहिला असून, या कारखान्याने ९ लाख १० हजार ९३० मेट्रिक टन उसाचे गाळप करत १० लाख ९८ हजार ५७० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.
याशिवाय शरयू कारखान्याने ८ लाख ४१ हजार ५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ९ लाख १७ हजार ८५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. स्वराज ४ लाख ९४ हजार ३३ टन उसाचे गाळप करत ५ लाख ३४ हजार ३५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. ग्रीन पॉवरने ६ लाख १४ मेट्रिक टन गाळप पूर्ण करत ७ लाख १ हजार ८९० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जयवंत शुगरने ६ लाख १४ हजार १० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ९६ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. न्यू फलटण साखरवाडी कारखान्याने २ लाख ८३ हजार ४५७ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करत ३ लाख ३ हजार २५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. खंडाळा तालुका साखर कारखान्याने २ लाख ९१ हजार १६० मेट्रिक टन ऊस गाळप करून ३ लाख ३३ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.
रयत कारखान्याने ४ लाख ४४ हजार ९४० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. अजिंक्यतारा कारखान्याने ६ लाख ७ हजार ९८० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ३३ हजार ८२० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने २ लाख ४२ हजार २५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. किसन वीर कारखान्याने ८ लाख १८ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर श्रीराम कारखान्याने ३ लाख ८५ हजार ९३५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ४ लाख ४८ हजार ६५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
चार कारखान्यांचे गाळप लवकरच संपणार
उसाअभावी जिल्ह्यातील श्रीराम-(जवाहर) फलटण, लोकनेते बाळासाहेब देसाई पाटण, रयत कºहाड, न्यू फलटण साखरवाडी, स्वराज फलटण, खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना, जरंडेश्वर, जयवंत शुगर, ग्रीन पॉवर गोपूज, शरयू फलटण या नऊ कारखान्यांचे गाळप दि. १५ एप्रिलअखेर बंद झाले आहे. तर उर्वरित चार कारखान्यांचा गाळप हंगाम एप्रिलअखेर संपणार आहे.
वर्ष साखर गाळप मे. टन साखर (लाख क्विंटल)
२०१४-१५ ७५ लाख ६५ हजार ६३२ ८९ लाख ६ हजार २९
२०१५-१६ ७७ लाख ६५ हजार ३७८ ९० लाख ६६ हजार १८
२०१६-१७ ५४ लाख ३६ हजार ९३५ ६४ लाख ५१ हजार ७२