लग्नाचं आश्वासन, तरुणीला १६ लाखांना गंडा; साखरपुडा करूनही फसवणूक

By दत्ता यादव | Published: December 10, 2023 07:55 PM2023-12-10T19:55:07+5:302023-12-10T19:55:28+5:30

हतबल तरुणाची तक्रार.

promise of marriage the girl is looted 16 lakhs | लग्नाचं आश्वासन, तरुणीला १६ लाखांना गंडा; साखरपुडा करूनही फसवणूक

लग्नाचं आश्वासन, तरुणीला १६ लाखांना गंडा; साखरपुडा करूनही फसवणूक

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : पैसे उकळण्याच्या उद्देशाने लग्नाचे आश्वासन देऊन तरुणाशी साखरपुडाही केला. त्यानंतर तरुणाकडून वेळोवेळी पैसे घेऊन लग्न न करताच तरुणीने ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाला तब्बल १६ लाखांना गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाशी काजलशी (वय २३, रा. सातारा, बदललेले नाव) ओळख होती. या ओळखीतून पूजाने त्याच्याकडून सुरुवातीला व्यवसायात गुंतवणुकीसाठी एक लाख रुपये घेतले. त्यानंतर भेटीगाठी वाढवून तरुणाला लग्न करणार असल्याचे खोटे आश्वासन दिले. आणखी पैसे उकळण्याच्या उद्देशाने साखरपुडा होऊनही लग्न पुढे ढकलले. तरुणाच्या दाजींनी तिला १० लाख रुपये दिले व तरुणाने ५ लाख व लग्नासाठी दिलेले दागिने असे १६ लाख रुपये तिला दिले. मात्र, तिने लग्न करण्यास टाळाटाळ केल्याने तिला गेल्या वर्षभरापासून पैसे परत मागण्यात येत होते. परंतु तिने पैसे परत केले नाहीत. या प्रकारानंतर तरुणाने १० डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते हे अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांकडून तातडीने तपास सुरू

सातारा शहरातील राधिका रस्त्यावर एक दुकान आहे. या दुकानात दोघांमध्ये पैशाचा व्यवहार झाला असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार १९ नोव्हेंबर २०२२ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत घडला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. पोलिसांचे एक पथक तरुणीच्या घरी गेले होते. मात्र, ती घरातून गायब झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: promise of marriage the girl is looted 16 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.