ब्रिगेडिअर नंदकिशोर जाधव यांची मेजर जनरल पदावर पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:43 AM2021-08-24T04:43:11+5:302021-08-24T04:43:11+5:30
सातारा : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या ब्रिगेडियर नंदकिशोर जाधव यांची मेजर जनरल पदावर पदोन्नती झाली ते सध्या जम्मू-काश्मीर ...
सातारा : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या ब्रिगेडियर नंदकिशोर जाधव यांची मेजर जनरल पदावर पदोन्नती झाली ते सध्या जम्मू-काश्मीर येथे कार्यरत आहेत.
कोरेगाव तालुक्यातील आर्वी या गावचे सुपुत्र असलेले नंदकिशोर जाधव कै. मेजर साहेबराव जाधव व सातारा येथील माजी सैनिकांच्या मुलींचे वसतिगृहाच्या माजी अधीक्षिका सुभद्रा जाधव यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे शिक्षण मिलिटरी स्कूल, बेळगाव येथे झाले आहे. त्यांची १९८४ मध्ये एनडीएसाठी निवड झाली. एनडीएमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथील प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आर्टिलरी ब्रिगेडचे नेतृत्व लडाख या ठिकाणी केले. त्यांनी नाशिकच्या आर्टिलरी सेंटरचे कमांडन्ट म्हणूनही सेवा बजावली आहे. जाधव यांची तिसरी पिढी सैन्य दलात कार्यरत आहे. त्यांचे आजोबा दुसऱ्या महायुद्धात सहभागी होते. तसेच जाधव यांचे ज्येष्ठ बंधू राजकुमार जाधव आर्टिलरीमध्ये कर्नल पदावरून गतवर्षी सेवानिवृत्त झालेले आहेत. लहान बंधू गुरुदत्त साहेबराव जाधव आर्टिलरीमध्ये ब्रिगेडिअरपदी कार्यरत आहेत. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांचे काैतुक करून पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.
.....................