प्रचार थांबला; जोडण्या सुरू
By Admin | Published: February 19, 2017 11:01 PM2017-02-19T23:01:18+5:302017-02-19T23:01:18+5:30
उद्या मतदान : जि. प. ६४ गट, पं. स.च्या १२८ गणांत ‘हाय अलर्ट’
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार रविवारी थांबला. जिल्ह्यातील ६४ गटांत तसेच १२८ गणांमध्ये राजकीय मंडळींसह प्रशासनाने हायअलर्ट ठेवला आहे. उद्या, मंगळवारी (दि. २१) जिल्ह्यातील १९ लाख ६६ हजार ५८४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ९ लाख ५२ हजार २३ स्त्रिया, १0 लाख १४ हजार ४८६ पुरुष व इतर ५ मतदारांचा समावेश आहे.
निवडणुकीतील १९२ जागांसाठी ८१७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या ६४ गटांसाठी २८९ उमेदवार व पंचायत समितीच्या १२८ गणांसाठी ५३५ उमेदवार नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. जाहीर प्रचार थांबला असल्याने नेतेमंडळी, उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे.
जिल्ह्यात ६४ गट व १२८ गणांसाठी २ हजार ५८४ मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. मतदान केंद्रांवर नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण दिले आहे. मतदान मशीनची तपासणीही काटेकोरपणे केली जात आहे. ाूक विभागाचा ‘वॉच’ आहे.
सातारा तालुक्यात ३७८ मतदान केंद्रे आहेत. २ लाख ३२९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जावळी तालुक्यातील १५० केंद्रांवर ८४ हजार ५१५ मतदार मतदान करतील. माण तालुक्यात १७३ केंद्रांवर १ लाख ४६ हजार ९३५, खटावात २५६ केंद्रांवर २ लाख १३ हजार ८२६, फलटणमध्ये २५१ केंद्रांवर २ लाख २२ हजार ४२८, कऱ्हाडात ४३४ केंद्रांवर ३ लाख ५१ हजार १७४, वाईत १५३ केंद्रांवर १ लाख २५ हजार ८०८, महाबळेश्वरात १०७ केंद्रांवर ३२ हजार ४७३, खंडाळ्यात १०५ केंद्रांवर ८७ हजार ३२०, कोरेगावात २१० केंद्रांवर १ लाख ७४ हजार १६४, पाटणमध्ये २ लाख ४७ हजार ६०२ इतके मतदार मतदान करणार आहेत.