जावळीतील प्रचाराचा झंझावात थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:32 AM2021-01-14T04:32:59+5:302021-01-14T04:32:59+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावात बुधवारी सायंकाळी संपला. आता उमेदवार वॉर्डातील एक-एक मत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत ...
कुडाळ : जावळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावात बुधवारी सायंकाळी संपला. आता उमेदवार वॉर्डातील एक-एक मत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
जावळी तालुक्यातील पूर्व भागात बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. कुडाळ विभागातील कुडाळ, बेलावडे, बामणोली तर्फ कुडाळ, सरताळे, सर्जापूर या गावांची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे, तर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कुडाळ ग्रामपंचायतीकडे मात्र, सर्वांचेच लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने प्रचारासाठी १३ जानेवारीच्या सायंकाळपर्यंत दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता थंडावली आहे.
जावळी तालुक्यातील विविध गावच्या ७२ वॉर्डमधून निवडून जाणाऱ्या २४२ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी होणाऱ्या मतदानावर ठरणार आहे. जाहीर प्रचार बंद झाल्याने उमेदवारांकडून वैयक्तिक संपर्कावर जोर दिला जाणार आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
\\\\\\\\\\\\\\\\\