वारांगनांना मिळाली शिधापत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:16+5:302021-07-10T04:27:16+5:30
येथील टाऊन हॉलजवळ अनेक वर्षांपासून देवदासी व वारांगणा राहत आहेत. स्वत:ची अशी त्यांच्याजवळ ओळख नव्हती. त्यामुळे शासकीय योजनांपासून त्या ...
येथील टाऊन हॉलजवळ अनेक वर्षांपासून देवदासी व वारांगणा राहत आहेत. स्वत:ची अशी त्यांच्याजवळ ओळख नव्हती. त्यामुळे शासकीय योजनांपासून त्या वंचित राहत होत्या. याची दखल घेऊन कऱ्हाड तहसील कार्यालयाने त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन त्यांना रेशनकार्ड दिली. तहसीलदार अमरदीप वाकडे व पुरवठा निरीक्षक गोपाल वसू यांच्या हस्ते २३ महिलांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. तसेच येथील महिलांना प्रत्येकी दहा किलोप्रमाणे तांदळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी पुरवठा निरीक्षक विलास गभाले, रेशन दुकानदार बी. एन. देसाई, संजय शेटे उपस्थित होते. वारांगणा व देवदासींना दिलेले रेशनकार्ड बी. एन. देसाई व संजय शेटे यांच्या स्वस्त धान्य दुकानाला जोडले गेले आहे. त्यामुळे कार्डधारक महिलांना रेशनिंग धान्य उपलब्ध होणार आहे.
फोटो : ०९केआरडी०५
कॅप्शन : कऱ्हाड येथील पुरवठा विभागाच्या वतीने वारांगणा व देवदासींना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.