साताऱ्यात लॉजवर वेश्या व्यवसाय; मुंबईच्या तीन तरुणींची सुटका, तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 04:59 PM2023-07-26T16:59:54+5:302023-07-26T17:00:10+5:30
वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशावर अवलंबून राहून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रोत्साहित केले
सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मलबार लाॅजिंग अँण्ड बोर्डिंग या लाॅजवर सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून तीन तरुणींची सुटका केली. ही कारवाई दि. २४ रोजी दुपारी साडेचार वाजता करण्यात आली. या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तिघांवर मानवी अनैतिक व्यापार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाैतम परमेश्वर काकडे (वय २८, रा. लातूर), जय अमर कांबळे (वय २०, रा. प्रतापसिंह नगर, सातारा), अमित वाघमारे (रा. बुधवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मलबार लाॅजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तेथे धाड टाकली. त्यावेळी नवी मुंबईतील तीन तरुणींची पोलिसांनी सुटका केली.
या तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशावर अवलंबून राहून वरील संशयितांनी त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रोत्साहित केले. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक अनिता मेणकर-आमंदे या अधिक तपास करीत आहेत.