बौद्ध लेण्यांचे संरक्षण करावे
By admin | Published: December 31, 2015 10:44 PM2015-12-31T22:44:51+5:302016-01-01T00:01:49+5:30
मीराताई आंबेडकर : कऱ्हाडला महाविहार केंद्राचे उद्घाटन
कऱ्हाड : ‘बौद्ध लेण्यांकडे बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणे झाली असून, ती सरकारने हटवून या लेण्यांना संरक्षण द्यावे. बौद्ध लेण्यांना पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यानंतर या परिसरात पायाभूत सुविधा देण्याकडे सरकारने लक्ष द्यावे,’ अशी मागणी भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांनी केली. दरम्यान, कऱ्हाडात अत्याधुनिक
सुविधानियुक्त साकारत असलेले महाविहार हे आदर्शवत संस्कार केंद्र असून, त्यास धम्म दान देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा शाखेच्या वतीने कऱ्हाड येथे कऱ्हाड-तासगाव रोडवरील महाविहारामध्ये आयोजित सोळावी भव्य धम्म परिषद व दीक्षा समारंभ व महाविहार हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष व्ही. आर. थोरवडे होते. चैत्यभूमी मुंबई येथील भन्ते दीपंकरजी, राष्ट्रीय सचिव एन. एम. आगाणे, प्रभाकर जाधव, वि. म. रूपवते, अलकाताई टेकाळे, मधुकर भोसले, समता सैनिक दलाचे मेजर दादासाहेब भोसले, रूपेश तामगावकर, सुदाम ढापरे, दिलीपराव थोरवडे, अरुण गायकवाड, व्ही. एस. गायकवाड, राजेंद्रकुमार काकडे, कांताताई डोंगरे, शोभाताई कांबळे, डॉ. मीना इंजे, डॉ. प्रल्हाद इंजे, महेश लोखंडे उपस्थित होते. यावेळी कऱ्हाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मिराताई आंबेडकर यांनी अभिवादन केले. समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
मिराताई आंबेडकर म्हणाल्या, ‘धार्मिक कार्यात सर्व बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन हा धम्म कार्याचा रथ पुढे नेला पाहिजे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या शाखा प्रत्येक गावात तरुणांनी काढाव्यात आणि समता सैनिक दलाची शिबिरे घेऊन समाजाचे सैनिक तयार केले पाहिजेत.’ विविध मागण्यांचे ठराव या परिषदेत करण्यात
आले. (प्रतिनिधी)