मोठ्या मूर्तींचे विसर्जन टाळून पर्यावरणाचे रक्षण

By admin | Published: September 29, 2015 09:55 PM2015-09-29T21:55:00+5:302015-09-30T00:02:36+5:30

प्रशासनाकडून कौतुक : सातारा शहरातील १९ मंडळांचा पुढाकार

Protecting the environment by avoiding huge idols | मोठ्या मूर्तींचे विसर्जन टाळून पर्यावरणाचे रक्षण

मोठ्या मूर्तींचे विसर्जन टाळून पर्यावरणाचे रक्षण

Next

दत्ता यादव- सातारा  -शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे महाकाय गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात. मात्र, पर्यावरणाची हानी होत असल्याबाबत ‘लोकमत’ने जनजागृती केल्याने शहरातील तब्बल १९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा मोठ्या मूर्तीचे विसर्जन न करता छोट्या मूर्तींचे विसर्जन केले. यंदा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वत:हून पुढाकार घेतल्याने प्रशासनाकडूनही त्यांचे कौतुक होत आहे.
हल्ली गणेशोत्सव म्हटलं की भरमसाठ खर्च. जस-जशी महागाई भडकत गेली तस-तसा गणेशोत्सवाचा खर्चही लाखांच्या घरात पोहोचला. मोठ्या गणेशमूर्तीची किंमत २५ हजारांपासून ते सव्वा लाखांपर्यंत असते. त्यामुळे दरवर्षी मंडळातील कार्यकर्ते वर्गणी अथवा स्वच्छेने पैसे काढून मूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात. त्यामुळे इथून पुढे दरवर्षी एकच मूर्ती कायम ठेवली तर खर्चही वाचेल; शिवाय पर्यावरणाचे रक्षणही होईल, अशी दुहेरी भूमिका घेऊन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंदा इतर मंडळांना आर्दश घालून दिलाय.
गेल्या वर्षी शहरातील केवळ सहा मंडळांनी मूर्ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यंदा ‘लोकमत’ने राबविलेल्या चळवळीमुळे या उपक्रमाला चांगली बळकटी आली. त्यामुळे पाहता-पाहता १९ गणेश मंडळांनी मूर्ती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक गणेशोत्सव मंडळ (पोवई नाका), जयहिंद गणेशोत्सव मंडळ (शनिवार पेठ), एकता गणेश उत्सव मंडळ (गुरवार पेठ), वटसिद्धी गणेश मंडळ (एसटी कॉलनी, सातारा) यासह अन्य मंडळांचा त्यामध्ये समावेश आहे. मोठी मूर्ती ठेवायची कुठे, असा प्रश्न उपस्थित होत असला तरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खासगी जागेमध्ये अशा मूर्ती सुरक्षित ठेवल्या आहेत. मोठ्या मूर्ती झाकून त्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या आहेत.
मोठ्या मूर्तींऐवजी लहान मूर्तीचे विसर्जन करून पर्यावरणाच्या दृष्टीनेही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विचार केलाय. काही मंडळांनी आदल्या दिवशी अचानक निर्णय घेऊन मोठ्या मूर्तीचे विसर्जन करायचे नाही, असा निर्णय घेतला. पोलिसांच्या रेकॉर्डवर शहरातील १९ मंडळांची नोंद असली तरी नोंद नसलेल्या अनेक मंडळांनी या वर्षी मोठ्या मूर्तींचे विसर्जन केले नाही. विसर्जन न करणाऱ्या मंडळांचा आकडा पुढील वर्षी यापेक्षाही वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त होत
आहे.

Web Title: Protecting the environment by avoiding huge idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.