वाईत इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:03+5:302021-07-07T04:48:03+5:30
वाई : वाढलेल्या महागाई व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाई येथे आंदोलन करण्यात आले आहे. तसेच विविध ...
वाई : वाढलेल्या महागाई व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाई येथे आंदोलन करण्यात आले आहे. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार रणजित भोसले यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सततच्या संचारबंदीमुळे सामान्य जनता त्रासून गेली आहे. अनेक कुटुंबांचे जगणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर तसेच गॅस, पेट्रोल व डिझेलच्या किमतीही सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. सामान्य माणसाला जीवनावश्यक गरजांची जुळवाजुळव करणे अवघड झाले आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ रविवारी वाई तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणावे अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रतापराव पवार, रमेश गायकवाड, पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, महादेव मस्कर, अनिल जगताप, मदन भोसले, दिलीप पिसाळ, बाळासाहेब चिरगुटे, बापूसाहेब जमदाडे, राजेश गुरव, अॅड. रवींद्र्र भोसले, नारायण जाधव, अमोल कदम, राजेंद्र्र सोनावणे, बुवा खरात, मोहन जाधव, प्रसाद मामा देशमुख, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : ०४वाई
वाई तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने रविवारी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. (छाया : पांडुरंग भिलारे)