साखर कारखानदार तुपाशी; ऊस उत्पादक शेतकरी उपाशी!, दीपावलीच्या दिवशीच कऱ्हाडात शेतकऱ्यांचे आंदोलन

By प्रमोद सुकरे | Published: October 24, 2022 06:24 PM2022-10-24T18:24:28+5:302022-10-24T18:28:37+5:30

यावेळी कारखानदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.

Protest in front of Karad Tehsildar Office of Baliraja Farmers Association | साखर कारखानदार तुपाशी; ऊस उत्पादक शेतकरी उपाशी!, दीपावलीच्या दिवशीच कऱ्हाडात शेतकऱ्यांचे आंदोलन

साखर कारखानदार तुपाशी; ऊस उत्पादक शेतकरी उपाशी!, दीपावलीच्या दिवशीच कऱ्हाडात शेतकऱ्यांचे आंदोलन

Next

कऱ्हाड : सोमवारी दीपावलीच्या दिवशी बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कऱ्हाड तहसीलदार कार्यालय येथे खर्डा भाकरी खाऊन साखर कारखानदारांचा जाहीर निषेध केला. यावेळी कारखानदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.

मागील ५ वर्षामध्ये साखरेचा बाजार भाव २२०० रुपये वरून ३५०० रुपये पर्यंत साखरेला प्रतिक्विंटल भाव वाढलेला असताना सुद्धा मागील तीन- वर्षात ऊसाला ३१०० रुपये वरून २८०० रुपयापर्यंत  कारखानदारांनी उसाचा भाव कमी केलेला आहे. साखरेचा भाव वाढलेला असताना सुद्धा उसाचा भाव कमी का झाला याचा विचार ऊस उत्पादकांनी केला पाहिजे. मागील ५ वर्षात ऊसाचा उत्पादन खर्च दुपटीने वाढलेला आहे शेअर भांडवल दीडपट वाढलेले आहे. मात्र उसाचा दर मागील तीन वर्षात कमी केल्याबद्दल साखर कारखानदारांचा बळीराजा शेतकरी संघटनेने दिपवाळी दिवशी तहसील कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाऊन कारखानदारा विरोधात घोषणा देऊन कारखानदारांचा निषेध करण्यात आला.

येणाऱ्या गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर करूनच ऊसाला तोड सुरू करावी अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी ऊसतोड घेणार नाहीत याची नोंद साखर कारखान्यांनी घ्यावी. बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करतो की जोपर्यंत साखर कारखानदार उसाचा दर जाहीर करीत नाहीत तोपर्यंत आपल्या शेतातील व गावातील ऊस तोडी घेऊनयेत व घेतल्यास ऊस तोडी व उसाची वाहतूक थांबवण्यात यावी. तरच आपल्या ऊसाला योग्य भाव मिळणार आहे.  

या आंदोलनात पंजाबराव पाटील, बी जी  पाटील, प्रदेशाध्यक्ष विश्वास जाधव, जिल्हाध्यक्ष उत्तम अण्णा खबाले, पोपट जाधव ,सचिन पाटील, दीपक पाटील, शंभुराजे पाटील, गणेश शेवाळे, युवा अध्यक्ष बाबा मोहिते, सागर कांबळे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Protest in front of Karad Tehsildar Office of Baliraja Farmers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.