ब्रिजभूषण सिंगसह सरकार विरोधात पाटणमध्ये निषेध मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 04:56 PM2023-06-05T16:56:33+5:302023-06-05T16:58:15+5:30

'भाजपा सरकारचा महिला विरोधी चेहरा जनतेसमोर उघड करू'

Protest march in Patan against Govt with Brijbhushan Singh | ब्रिजभूषण सिंगसह सरकार विरोधात पाटणमध्ये निषेध मोर्चा

ब्रिजभूषण सिंगसह सरकार विरोधात पाटणमध्ये निषेध मोर्चा

googlenewsNext

प्रवीण जाधव

पाटण : महिला कुस्तीपट्टूंवर अन्यायप्रकरणी ब्रिजभूषण सिंग व या विरोधातील कुस्तीपटूंचे आंदोलन अमानुषपणे चिरडणाऱ्या सरकारचा महाविकास आघाडीच्यावतीने पाटण येथे मोर्चा काढून निषेध करण्यात आला. कुस्तीपटू महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या खासदार ब्रिजभूषण सिंगला तत्काळ अटक करून कठोर शासन करावे. या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

आंदोलनामध्ये पाटण तालुक्यातील कुस्तीपट्टू, युवक, महिला, युवती, खेळाडू व विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग होता. यावेळी आंदोलनकर्ते भावना व्यक्त करताना म्हणाले, ‘दिल्लीत ३६ दिवसांपासून महिला कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्या कुस्तीगीरांवर दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अमानवी आणि जुलमी कारवाई केली. आंदोलनकर्त्या महिला व त्यांच्या समर्थकांना फरफटत नेऊन डांबून ठेवले. ही कारवाई होत असताना दीड किलोमीटर अंतरावर नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा थाटामाटात सुरू होता. त्याच दरम्यान लोकशाहीच्या मोठ-मोठ्या आणाभाकादेखील घेतल्या जात होत्या.

एकीकडे बेटी बचाव-बेटी पढावची घोषणा द्यायची आणि दुसरीकडे देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून पदके जिंकणाऱ्या मुलींवर अमानुष पद्धतीने कारवाई करायची आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना संरक्षण द्यायचे. या ढोंगी सरकारचा पाटण तालुक्यातील जनता निषेध करत आहे. हे सरकार त्यांच्या पक्षाचा खासदार ब्रिजभूषणला वाचविण्यासाठी हे हुकूमशाही वृत्तीचे, महिला विरोधी कृत्य करत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. भविष्यात जनता रस्त्यावर विरोध प्रदर्शन करू आणि भाजपा सरकारचा महिला विरोधी चेहरा जनतेसमोर उघड करू, असा विश्वास आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी नगराध्यक्षा मंगल कांबळे, उपनगराध्यक्ष सागर पोतदार, पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲड. अविनाश जानुगडे, शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष सुरेश पाटील, मनसे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर, स्नेहल जाधव, गुरुदेव शेडगे, रेखाताई जाधव, पंचायत समिती माजी सदस्या मिलन सय्यद, युवक उपाध्यक्ष सम्राट घेवारी, योगेश महाडिक, विजय घाडगे, दिनकर धामणकर, राष्ट्रवादीचे संदीप लोहार, विश्वजीत पाटणकर, मनोहर यादव, डॉ. दीपक डांगे, किशोर लोहार, सूरज पंधारे, अष्पाक शैख, प्रवीण भिसे ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Protest march in Patan against Govt with Brijbhushan Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.