जलमय खड्ड्यात वृक्षारोपण करून करणार निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:22+5:302021-07-04T04:26:22+5:30
निवेदनात म्हटले आहे, कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावरील येराड ते संगमनगर (धक्का) व तेथून पुढे घाटमाथ्यापर्यंत खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे ...
निवेदनात म्हटले आहे, कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावरील येराड ते संगमनगर (धक्का) व तेथून पुढे घाटमाथ्यापर्यंत खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. रस्त्यावरून वाहन चालविताना वाहन चालकांसह पादचाऱ्यांना कसरत करतच ये-जा करावी लागत आहे. कित्येक वेळा वाहने रस्त्यावरच बंद पडलेली आहेत. आजारी व्यक्ती अथवा महिलेला वेळेत दवाखान्यात न पोहोचल्यामुळे वाटेतच जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याचा सर्वसामान्य जनतेला त्रास किती होत आहे, याची जाणीव संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना किंचितही नाही.
अनेक वेळा आंदोलने, रास्ता रोको केला, तरीही संबंधित विभागावर त्याचा कसलाच परिणाम झाला नाही. याच्या निषेधार्थ सोमवार, दि. ५ रोजी सकाळी दहा वाजता संगमनगर (धक्का) येथे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून, संबंधित विभागाचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे.