आंदोलक टोलनाक्यावर... कर्मचारी रस्त्यावर, आनेवाडी नाका बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:50 PM2019-12-18T12:50:57+5:302019-12-18T12:52:08+5:30
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेवाडी टोल नाका बंद पाडून निदर्शने केली.
सातारा : पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेवाडी टोल नाका बंद पाडून निदर्शने केली.
गेल्या काही दिवसांपासून महामार्गाची झालेली दुरावस्था आणि त्यातून प्रवास करताना सामान्याचे होणारे हाल याविषयी आमदार शिवेंद्रराजे यांनी विविध स्तरावर पत्रव्यवहार आणि भेटी घेऊन प्रशासनाकडे दाद मागितली होती.
गत महिन्यात याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन, महामार्ग प्राधिकरण आणि रिलान्सच्या अधिकाऱ्यांनी वेळ मागून घेतली होती. निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यात अपयश आल्याचा निषेधार्थ हे आंदोलन कऱण्यात आले.
सकाळी साडे अकराला आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी आमदार शिवेंद्रराजे यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत टोल नाक्यावरील वसुली बंद केली. यावेळी पंचायत समिती सभापती मिलिंद कदम, अविनाश कदम, अमोल मोहिते, कांचन साळुंखे, फिरोज पठाण आदी उपस्थित होते.