कऱ्हाडात राष्ट्रवादीची इंधन दरवाढी विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:39 AM2021-03-27T04:39:56+5:302021-03-27T04:39:56+5:30

कराड येथे दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आंदोलकांनी प्रथम अभिवादन केले. त्यानंतर केंद्र सरकारने केलेला शेतकरी कायदा, ...

Protests by NCP against fuel price hike in Karachi | कऱ्हाडात राष्ट्रवादीची इंधन दरवाढी विरोधात निदर्शने

कऱ्हाडात राष्ट्रवादीची इंधन दरवाढी विरोधात निदर्शने

Next

कराड येथे दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आंदोलकांनी प्रथम अभिवादन केले. त्यानंतर केंद्र सरकारने केलेला शेतकरी कायदा, पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ, गॅस दरवाढ विरोधी निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने केलेले काळे शेतकरी कायदे, रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधव शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत, केंद्रातील भाजप सरकारने जनविरोधी निर्णय घेतले आहेत. इंधन गॅस, पेट्रोल, डिझेलच्या प्रचंड दरवाढीमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. म्हणून संयुक्त किसन मोर्चाने देशातील ५०० पेक्षा जास्त संघटना, पक्ष एकत्र येऊन दिल्ली येथे शेतकरी बांधव गेली १०० दिवसांपासून जास्त काळ आंदोलन करत आहेत. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

आंदोलनात कऱ्हाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार बटाणे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पोपटराव साळुंखे, अख्तर अंबेकरी, शिवाजी पवार, माजी नगरसेवक सुहास पवार, मोहम्मद आवटे, अनिल धोतरे, माजी नगरसेवक गंगाधर जाधव, माजी उपनगराध्यक्ष संभाजीराव सुर्वे, भाऊ पवार, सतीश भोंगाळे, सुहेल बारस्कर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो :

कऱ्हाड येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात निदर्शने करण्यात आली.

Web Title: Protests by NCP against fuel price hike in Karachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.