पाकिस्तानी मग्रुरीचा मेढ्यात निषेध -मनसेचा मोर्चा : जावळी तालुक्याचे भूमिपुत्र असणाऱ्या कुलभूषण जाधव कुटुंबीयांच्या अपमानप्रकरणी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:11 PM2018-01-01T23:11:39+5:302018-01-01T23:15:58+5:30
सातारा : जिल्ह्यातील आनेवाडीचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांचा इस्लामाबाद येथे अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ
सातारा : जिल्ह्यातील आनेवाडीचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांचा इस्लामाबाद येथे अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली जावळी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा येथे निषेध करण्यात आला. तहसीलदार रोहिणी आखाडे यांना निवेदन देण्यात येऊन पाकिस्तानचा निषेध करण्यात आला.
निवृत्त लष्करी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नी भेटीवेळी सौभाग्य अलंकार काढून व मातृभाषेत बोलण्यास बंदी घालण्यात आली. पाकिस्तान सरकारमधील जबाबदार घटकांकडून मग्रुरीचेच वर्तन घडल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक जाधव हे कोणतेही क्रूर गुन्हेगार नाहीत. तसेच ते भारतीय हेर नसल्याचा खुलासाही भारत सरकारने केला आहे. असे असतानाही नियमावलींचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे पाकिस्तान सरकारने जाधव यांना तुरुंगात डांबून ठेवले आहे.
याशिवाय जाधव कुटुंबीयांची परस्परांशी भेट होऊ न देता त्यांच्या धार्मिक भावना दुखावतील, अशा पद्धतीने अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकारामुळे संपूर्ण भारतीयांचा आणि भारतीय संस्कृतीचाच पाकिस्तानने अपमान केला आहे, असे सांगून संदीप मोझर यांनी पाकिस्तानच्या निषेधाचे निवेदन तहसीलदार यांना दिले.
मोर्चात मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, उपजिल्हाध्यक्ष अश्विन गोळे, मधुकर जाधव, बाळासाहेब गायकवाड, सागर पवार, हेमंत गुजर, बाळकृष्ण पिसाळ, सुभाषराव चौधरी, ज्येष्ठ नेते वासुदेव माने, दत्ता करंजेकर, सुशील कदम, संदीप जाधव, सुधीर बुधावले, अमित यादव, सदाभाऊ पिसाळ, अविनाश दुर्गावळे, विजय पंडित, राजेंद्र सणस, सागर बर्गे, रामदास वाघचौरे, अधिक सावंत, बाबासाहेब फडतरे, सर्जेराव भिलारे, राजेंद्र बावळेकर, नितीन पारटे, उमकार नाविलकर, शिवाजी कासुर्डे, तेजस चोरगे, राहुल पवार, दिलीप सोडमिसे, अनिता जाधव, राजाराम गोळे, हरिभाऊ गोळे, पोपट गोळे, लक्ष्मण गोळे, प्रशांत गोळे, सुभाष गोळे, इरफान आतार, संतोष गोळे, हरिष नाविलकर, गौरव रांजणे, प्रवीण गुजर, संजय गोळे, किरण गोळे, किरण कारंजकर, सुहास रणदिवे आदींनी सहभाग घेतला होता.