चित्रकृती प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:25 AM2021-06-28T04:25:58+5:302021-06-28T04:25:58+5:30
तळमावले : गलमेवाडी, ता. पाटण येथील तेजस्विनी भरत चोरगे यांची पिंपरी चिंचवड येथे सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी नियुक्ती झाली ...
तळमावले : गलमेवाडी, ता. पाटण येथील तेजस्विनी भरत चोरगे यांची पिंपरी चिंचवड येथे सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल डॉ. संदीप डाकवे यांनी चित्राच्या माध्यमातून त्यांचा गौरव केला आहे. तेजस्विनी यांच्या नावातील अक्षर गणेशा आणि पोर्ट्रेट देऊन त्यांचा डाकवे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
रिफ्लेक्टर बसवले
कऱ्हाड : गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी रिफ्लेक्टर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. महामार्गावर ज्या ठिकाणी छेदरस्ता आहे, अशा ठिकाणी रिफ्लेक्टर बसवून पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी ब्लिंकर्सही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक निर्धाेक होण्यास मदत झाली आहे.
साईडपट्ट्या खचल्या
कोपर्डे हवेली : कऱ्हाड-मसूर मार्गावरील रस्त्याकडेला असलेल्या साईडपट्ट्या ठिकठिकाणी खचल्या आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. खचलेल्या साईडपट्ट्यांवरून दुचाकी वाहने जात असताना वाहनचालकाचा तोल जाऊन अपघात होत आहेत. रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्याची मागणी प्रवाशांसह वाहनधारकांतून केली जात आहे.
फलक सुस्थितीत
कऱ्हाड : शहरातील महत्त्वाचे चौक, ठिकाणे तसेच मार्गाबाबत माहिती देणारे सूचना व दिशादर्शक फलक महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे शहरात बाहेरच्यांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील शेतकरी आपला भाजीपाला विक्रीस शहरात घेऊन येत असल्याने त्यांना दिशादर्शक फलकांमुळे ठिकाणांची माहिती होत आहे.