मूलभूत सुविधा पुरवून गावकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरविला : प्रतीक कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:38 AM2021-03-16T04:38:22+5:302021-03-16T04:38:22+5:30

किडगाव : ‘आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लिंब गटातील अनेक गावांमध्ये लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत. ...

By providing basic facilities, the trust of the villagers was realized: Prateek Kadam | मूलभूत सुविधा पुरवून गावकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरविला : प्रतीक कदम

मूलभूत सुविधा पुरवून गावकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरविला : प्रतीक कदम

Next

किडगाव : ‘आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लिंब गटातील अनेक गावांमध्ये लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत. येथील लोकांना मूलभूत सुविधा मिळवून देऊन त्यांचा विश्वास सार्थकी लावला आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतीक कदम यांनी केले.

वेळे येथील विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी, तसेच आमदार शिवेंद्रराजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक कदम यांच्या जिल्हा परिषद फंडातून मंजूर झालेल्या रस्ते काँक्रिटीकरण व बंदिस्त गटारकाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

प्रतीक कदम म्हणाले, ‘गत ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही एकहाती सत्ता मिळवली आहे. यापुढेही बाबाराजेंच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी ठामपणे उभे राहणार आहे. ज्यांच्यामध्ये काम करण्याची तळमळ व ऊर्जा असते, त्यांच्या हाती लोक सत्ता देत असतात. लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे.’

यावेळी माजी सरपंच संजय शिंदे, सरपंच अक्षय राजगुरू, उपसरपंच छाया निकम, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला भोसले, विद्या शिंदे, यमुना शिंदे, सुशांत शिंदे, राजेंद्र कदम, शरद शिंदे, बाळासाहेब गुरव, गणपत घोरपडे, अरुण शिंदे, अनिल शिंदे, तात्यासाहेब शिंदे, कलेराव गुजले उपस्थित होते.

१५किडगाव

वेळे येथील रस्त्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रतीक कदम, संजय शिंदे, अक्षय राजगुरू, राजेंद्र कदम उपस्थित होते. (छाया : गुलाब पठाण)

Web Title: By providing basic facilities, the trust of the villagers was realized: Prateek Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.