सातारा  जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर मिळणार मानसिक आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 02:06 PM2020-04-16T14:06:59+5:302020-04-16T14:08:16+5:30

सातारा : कोरोना विषाणुमुळे सर्व समाज धास्तावलेला आहे. अशा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहे. आता ...

Psychic support will be available at Satara District Helpline! | सातारा  जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर मिळणार मानसिक आधार !

सातारा  जिल्ह्याच्या हेल्पलाईनवर मिळणार मानसिक आधार !

Next
ठळक मुद्देप्रशासनाची तयारी : समुपदेशनाची सुविधा; अनेक संस्थांचा सहभाग

सातारा : कोरोना विषाणुमुळे सर्व समाज धास्तावलेला आहे. अशा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहे. आता लोकांना मानसिक आधार आणि समुपदेशन देण्याची यंत्रणाही जिल्हा प्रशासनाने चालू केली आहे. यामध्ये अनेक संस्थांचा आणि मान्यवरांचा सहभाग राहिलाय.

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे समाजातील अनेक लोक मानसिक तणावातून जात आहेत. त्यातच काहीजण कुटुंबापासूनही लांब आहेत. कोणाशी प्रत्यक्ष भेटता न येणं हे सुद्धा एक ताणाचे कारण असू शकते. त्यामुळे आपल्याला नेमका कशाने संसर्ग होऊ शकतो आणि काय केल्याने त्यापासून सुरक्षित राहू असे विचारही त्रास देवू शकतो. अशा परिस्थितीत भावनिक अस्वस्थता वाटत असलेल्या लोकांना भावनिक प्रथमोपचार मिळावे यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पुढाकाराने चालणाऱ्या टोल फ्री हेल्प लाईनवर मानसिक आधार आणि समुपदेशनाची देखील सुविधा आता उपलब्ध आहे. उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शासनाचे अधिकारी, परिवर्तन संस्था, महाराष्ट्र अंनिस आणि काही समविचारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून मनोबल हेल्प लाईनच्या वीसपेक्षा अधिक तज्ज्ञ समुपदेशक आणि प्रशिक्षित मानस मित्र आणि मैत्रिणींच्या माध्यमातून ही सुविधा चालवली जाणार आहे.

मनोविकार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर, समुपदेशक रुपाली भोसले, योगिनी मगर आणि राणी बाबर समन्वयाचे काम पाहणार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे ज्यांना अस्वस्थता, भीती, निराशा, वाटत असेल अशा लोकांना समजून भावनिक आधार आणि समुपदेशन मनोबल हेल्पलाईनच्या माध्यमातून दिले जाणार आहे.


माहिती गोपनीय राहणार...

मराठी आणि हिंदी भाषेतून ही सेवा पुरवली जाईल. केवळ एक फोन करून ही सुविधा मिळू शकते. ही सेवा मोफत असून यासाठी कोणतेही शुल्क नाही. तसेच माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. स्थलांतरित कामगार आणि हातवार पोट असलेल्या लोकांना अडचणी सोडवण्याचा आणि त्यांना आधार देण्याचे काम देखील यामार्फत केले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

Web Title: Psychic support will be available at Satara District Helpline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.