हागणदारमुक्तीसाठी डायलागबाजीतून जनजागृती!

By admin | Published: April 22, 2017 12:54 PM2017-04-22T12:54:23+5:302017-04-22T12:55:32+5:30

गुडमॉर्निंग मोहीम : खंडाळ्यात सैराट, तुज्यात जीव रंगलाचे फ्लेक्स पाहण्यास नागरिकांची गर्दी

Public awareness campaign for redemption! | हागणदारमुक्तीसाठी डायलागबाजीतून जनजागृती!

हागणदारमुक्तीसाठी डायलागबाजीतून जनजागृती!

Next

आॅनलाईन लोकमत

खंडाळा(जि. सातारा), दि. २२ : ह्यस्वच्छ व सुंदर शहरह्ण ही संकल्पना वास्तवात उतरविण्यासाठी खंडाळा नगरपंचायतीने अनोखा फंडा वापरला आहे.

उघड्यावर शौचास नागरिकांनी बसू नये, शौचालय बांधावे, यासाठी नामांकित चित्रपटातील विविध चित्रफितींवर आधुनिक डायलॉगबाजी करून त्याद्वारे प्रबोधन करण्याचा प्रयोग राबवला आहे.

शौचालय उभारणीच्या कामात जनजागृती व्हावी म्हणून लावण्यात आलेल्या आकर्षक लक्षवेधी फ्लेक्सद्वारे स्वच्छतेचा मंत्र दिला जात आहे.

खंडाळा नगरपंचायत आस्तित्वात आल्यानंतर शहराच्या विकासाकरिता भरीव निधी उपलब्ध झाला आहे. विकासात्मक बाबींबरोबर स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत शहरात नव्याने शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंर्तगत नगरपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांच्यावतीने सर्व कर्मचाऱ्यांचे पथक करून गुडमॉर्निंग मोहीम राबवित उघड्यावर शौचविधी करणाऱ्यांना प्रतिबंध करत नागरिकांच्यामध्ये जनजागृती सुरू आहे.

Web Title: Public awareness campaign for redemption!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.