कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनतेने साथ द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:23 AM2021-03-30T04:23:12+5:302021-03-30T04:23:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. संसर्ग झालेल्या अत्यवस्थ व्यक्तीला ...

The public should support the prevention of corona infection | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनतेने साथ द्यावी

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनतेने साथ द्यावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. संसर्ग झालेल्या अत्यवस्थ व्यक्तीला ऑक्सिजनची आवश्यकता असेल, तर तो रुग्ण हा बेडपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबर ज्या रुग्णालयांमध्ये कोरोना संसर्गावर उपचार केले जात आहेत, अशा रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू देऊ नका, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक सोमवारी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे आदी उपस्थित होते.

कोरोना संसर्ग रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून ठेवा, अशा सूचना करून पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, प्रत्येक तालुक्यातील रुग्णवाहिकेची मागणी आल्यास तात्काळ उपलब्ध करून द्या. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, यासाठी आवाहन करावे. कोरोना संसर्ग रोखणे ही शासनाची, प्रशासनाची जबाबदारी आहे, तशीच नागरिकांची मोठी जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत केले.

Web Title: The public should support the prevention of corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.