वडूजमधील सार्वजनिक शौचालये हायटेक-: नगरपंचायतीची कचरामुक्तीकडे वाटचाल स्वच्छतेमध्ये आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:54 PM2019-02-02T23:54:38+5:302019-02-02T23:55:54+5:30

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत शहरातील सार्वजनिक शौचालये अत्याधुनिक करण्यात आले आहेत. यात मुबलक पाणी, विजेची सोय, अपंगासाठी रोलिंग रॅम्प, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे वडूज शहर हागणदारीमुक्त झाले आहे. तसेच सार्वजनिक शौचालयामुळे वडूज शहर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात आघाडी घेतली आहे.

Public toilets in Waduz Hi-Tech: Moving towards Garbage Panchayat deletion leads to cleanliness | वडूजमधील सार्वजनिक शौचालये हायटेक-: नगरपंचायतीची कचरामुक्तीकडे वाटचाल स्वच्छतेमध्ये आघाडी

वडूज येथील विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या सर्वाजनिक शौचालयांना रंगरांगोटी करण्यात आली आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देविविध सुविधांमुळे समाधान

वडूज : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत शहरातील सार्वजनिक शौचालये अत्याधुनिक करण्यात आले आहेत. यात मुबलक पाणी, विजेची सोय, अपंगासाठी रोलिंग रॅम्प, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे वडूज शहर हागणदारीमुक्त झाले आहे. तसेच सार्वजनिक शौचालयामुळे वडूज शहर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात आघाडी घेतली आहे.

यामध्ये नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी नागरिक व नगराध्यक्ष, नगरसेवकांचे मोठे योगदान आहे. तालुक्यातील मुख्यालयातील वडूज शहराची स्वच्छतेकडे सुरू असलेली वाटचाल निश्चितच वाखणण्याजोगी ठरत आहे. शहर स्वच्छता समन्वयक रुचिरा खंडारे, नगराध्यक्ष महेश गुरव, बांधकाम सभापती वचन शहा, नगरसेवक प्रदीप खुडे, अभय देशमुख यांच्यासह शहरातील नागरिक नूतन शौचालय पाहणीदरम्यान उपस्थित होते. आरोग्य, ड्रेनेज विभागातील अधिकारी, कर्मचारी दक्ष राहत आहेत. तसेच काही महिन्यांपासून नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण आघाडी घेत शहर कुंडीमुक्त करण्याबरोबरच कचरा डेपोमुक्त करण्यात आला आहे.

स्वच्छतेबरोबर शहरातील नागरिककांकडे शौचालयांची व्यवस्था आहे का? सामुदायिक, सार्वजनिक शौचालये आहेत का? या बाबी ही स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अंतर्भूत असल्याने शहरात सामुदायिकसह सार्वजनिक ३९ शौचालये अत्याधुनिक सुविधांयुक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयमधील स्वच्छतागृहे ही यानिमित्ताने स्वच्छ दिसू लागले आहे.

स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थेसह डिस्पोजल मशीन ही बसविण्यात आले आहे. तसेच २४१ लाभार्थ्यांचे शौचालये नगरपंचायतीच्या माध्यमातून उभारले आहेत.शहर ओडिएफप्लसप्लस होण्यासाठी वडूज नगरपंचायतीने कंबर कसली आहे. स्वच्छता गृहाबाहेर सूचनापेटी लावली आहे. शहरातील स्वच्छतागृहांच्या ठिकाणी लावलेल्या दिशादर्शक फलकावर शौचालयांच्या नावासह किती अंतरावर आहेत, याची नोंद केली आहे.

सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त
शहरांमध्ये बाजार चौकात एक, नाथमंदिर परिसरात एक, कुंभारगल्लीत एक, इंदिरानगर व आदिनाथनगरमध्ये प्रत्येकी दोन, संजयनगर, दबडेवस्ती प्रत्येकी एक असे मिळून नऊ युनिट शौचालये अत्याधुनिक स्वरुपात उभारलेले आहे. वडूज शहरात स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

 

नागरिकांनी स्वच्छतागृहांचा वापर करण्याबरोबर स्वच्छतागृहांची काळजीही घेणे गरजेचे आहे. या सुविधा सर्वांसाठीच असल्याने त्याचा योग्य वापर करावा. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात सुविधा असताना कोणीही उघड्यावर शौचविधी करू नये. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेऊयात, असे आवाहन केले.
-रुचिरा खंडारे, समन्वयक

 

Web Title: Public toilets in Waduz Hi-Tech: Moving towards Garbage Panchayat deletion leads to cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.