राष्ट्रवादीला जनता माफ करणार नाही

By admin | Published: April 17, 2017 01:12 PM2017-04-17T13:12:55+5:302017-04-17T13:12:55+5:30

मेघा कुलकणीर् : वाईत भाजप कार्यकर्ता मेळावा

The public will not forgive NCP | राष्ट्रवादीला जनता माफ करणार नाही

राष्ट्रवादीला जनता माफ करणार नाही

Next


आॅनलाईन लोकमत

वाई (जि. सातारा), दि. १७ : प्रत्येक निवडणुकीत हजारो कोटींची कामे केली, असा डांगोरा पिटून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा राष्ट्रवादीचा धंदाच आहे. विकासाचा बागुलबुवा करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना वाई तालुक्यातील जनता कदापि माफ करणार नाही,असा आरोप आवाहन कोथरुडच्या आमदार मेघा कुलकर्णी यांनी केला.

वाई येथील आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे अनावरण नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या दालनात करण्यात आले. दशलक्ष भीम या मोबाईलवरील अ‍ॅपचा प्रारंभ करण्यात आला. उज्ज्वला योजनेतील लाभधारकांना गॅसचे वाटप करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या समाजोपयोगी विविध योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी माजी खासदार व किसन वीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश फरांदे, जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, तालुकाध्यक्ष सचिन घाटगे, विजाया भोसले, नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे, बापूसाहेब शिंदे, युवा तालुकाध्यक्ष विक्रम वाघ, तालुका सरचिटणीस अशोक वाडकर, शहराध्यक्ष अजित वनारसे, महिला आघाडी शहराध्यक्षा सायली गोरे, राकेश फुले, नगरसेविका रुपाली वनारसे, वासंती ढेकाणे, प्रवीण बाबर, प्रशांत जगताप, प्रदीप क्षीरसागर, दिलीप वाडकर, डॉ, अशोक वाडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

माजी खासदार गजानन बाबर म्हणाले, ह्यवाई तालुक्यात राष्ट्रवादी म्हणजे नावाप्रमाणेच वाद निर्माण करून गावागावात भांडणे लावण्याचेच काम केले आहे. गावांचा विकास करण्याऐवजी गावाचे सामाजिक स्वास्थ धोक्यात आणले आहे. यांचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. वाई तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणार आहे.

कार्यक्रमाचे तालुकाध्यक्ष सचिन घाटगे यांनी प्रास्ताविक केले. अशोक वाडकर यांनी सूत्रसंचालन केले व अजित वनारसे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास वाई तालुक्यातील कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The public will not forgive NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.