कृषीदिनी शेताच्या बांधावर पुस्तक प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:17+5:302021-07-05T04:24:17+5:30

या वेळी शेतकरी सविता कुसळे, सुरेखा माने, सुशीला माने, अश्विनी माने, स्वाती माने, संगीता कुसळे, तानाजी कुसळे, ट्रस्टचे संस्थापक ...

Publication of a book on the construction of a farm on Krishidini | कृषीदिनी शेताच्या बांधावर पुस्तक प्रकाशन

कृषीदिनी शेताच्या बांधावर पुस्तक प्रकाशन

Next

या वेळी शेतकरी सविता कुसळे, सुरेखा माने, सुशीला माने, अश्विनी माने, स्वाती माने, संगीता कुसळे, तानाजी कुसळे, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप डाकवे उपस्थित होते.

विविध कवींनी शेती, शेतकरी यासंबंधी केलेल्या अप्रतिम कविता यात आहेत. प्रा. जयंत कदम, कोहिनूर कवी विलास काळे, सत्यवान मंडलिक, शिवाजी मस्कर, दादासाहेब पवार, प्रा. बबन साबळे, दीपाली साळवी, तुळशीराम सुतार, प्रा. सुरेश यादव, चंद्रकांत कांबिरे, प्रदीप पाटील या कवींच्या सुंदर कवितांनी काव्यसंग्रह बहरला आहे. शेतकरी राजाराम डाकवे यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकाचे संपादन डॉ. संदीप डाकवे व प्रा.ए.बी.कणसे यांनी केले असून, कलाशिक्षक बाळासाहेब कचरे यांनी कॅलिग्राफी केली आहे. या अनोख्या पुस्तक प्रकाशनाने शेतामध्ये भांगलण करणाऱ्या महिला भारावून गेल्या. शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान व्हावा. शेती, शेतकरी यांचे कष्ट, भावना, आनंद साहित्यातून लोकांसमोर यावे. शेतकऱ्यांचा आत्मसन्मान वाढावा, यासाठी या काव्यसंग्रहाची निर्मिती करण्यात आली असल्याचे डॉ. संदीप डाकवे यांनी सांगितले.

फोटो : ०४केआरडी०१

कॅप्शन : मान्याचीवाडी, ता. पाटण येथे कृषीदिनी शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

Web Title: Publication of a book on the construction of a farm on Krishidini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.