‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ पुस्तिकेचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:08+5:302021-04-14T04:35:08+5:30

कराड : कृष्णा कारखान्यात जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या सत्ताधारी संचालक मंडळाने गेल्या ५ वर्षांत सभासदांच्या हितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची ...

Publication of the booklet 'Krishna Pattern of Agricultural Prosperity' | ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ पुस्तिकेचे प्रकाशन

‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ पुस्तिकेचे प्रकाशन

Next

कराड : कृष्णा कारखान्यात जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या सत्ताधारी संचालक मंडळाने गेल्या ५ वर्षांत सभासदांच्या हितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची व धोरणांची सविस्तर माहिती देणारी ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. ५ वर्षांतील विकासकार्याचा लेखाजोखा मांडणाऱ्या या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन राजारामबापू दूध संघाचे माजी उपाध्यक्ष प्रल्हादराव पवार यांच्या हस्ते व ज्येष्ठ सभासद शेतकरी दिनकरराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. ही कार्य अहवाल पुस्तिका कृष्णा कारखान्याच्या सर्व सभासद शेतकऱ्यांपर्यंत लवकरच पोहचविली जाणार आहे.

कृष्णा कारखाना कार्यस्थळावर झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, संजय पाटील, निवासराव थोरात, ब्रिजराज मोहिते, अमोल गुरव, गिरीश पाटील, सुजीत मोरे, पांडुरंग होनमाने, दिलीपराव पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना जगदीश जगताप म्हणाले, गेल्या ५ वर्षांपूर्वी कृष्णा कारखान्यात जयवंतराव भोसले सहकार पॅनल सत्तेवर आले. तेव्हापासून आजपर्यंत अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले आमचे संचालक मंडळ शेतकरी सभासदांच्या हितासाठी अविरतपणे काम करत आहे. गेल्या ५ वर्षांत कारखान्यात आलेल्या आर्थिक शिस्तीमुळे आज कारखाना सुस्थितीत आहे. पारदर्शक कारभार करत, सभासदांसाठी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे आज कृष्णा कारखाना महाराष्ट्रात सहकारात पुन्हा नवाजला जात आहे. या गेल्या ५ वर्षांतील विकासकार्याचा संपूर्ण लेखाजोखा सोप्या भाषेत ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ या पुस्तिकेत मांडण्यात आला आहे. ही पुस्तिका लवकरच सर्व सभासदांपर्यंत पोहचविली जाणार असून, कृष्णा कारखान्याची विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारीची जाणीव ही पुस्तिका वाचल्यानंतर सभासदांना नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव देसाई म्हणाले, गेल्या ५ वर्षांत डॉ. सुरेश भोसले यांनी उत्कृष्टपणे कारखाना चालवित सभासदांच्या भल्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या सर्व कार्यकाळाचा सविस्तर पट या पुस्तिकेत मांडण्यात आला आहे.

शिवाजीराव थोरात यांनी स्वागत व प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचांलन केले. धोंडिराम जाधव यांनी आभार मानले. यावेळी बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, ज्येष्ठ सभासद पांडुरंग देशमुख, पैलवान वसंतराव कदम, महेश जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळी :

रेठरे बुद्रुक, ता. कराड येथे ‘कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करताना राजारामबापू दूध संघाचे माजी उपाध्यक्ष प्रल्हादराव पवार, ज्येष्ठ सभासद दिनकरराव मोरे, डॉ. अतुल भोसले, जगदीश जगताप व संचालक मंडळ.

Web Title: Publication of the booklet 'Krishna Pattern of Agricultural Prosperity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.