सरकारला एकजुटीतून खाली खेचा : पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:58 AM2017-11-26T01:58:28+5:302017-11-26T02:09:24+5:30
कºहाड : ‘शेतकºयांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदाच पाहतोय. कर्जमाफी, जीएसटीमुळे सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. शेतकºयांपाठोपाठ व्यापारी व युवकही आत्महत्या करू लागले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांचे बिलकुल नियंत्रण नाही. एकजुटीने या सरकारला खाली खेचल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कºहाड येथे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची आठवण व्हावी, अशी संकटमय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आज संबंध महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल आहे. उद्योगाच्या बाबतीत पिछाडीवर आहे. युवकांना दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. रोजगार नाहीत. नवीन उद्योग न निघाल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे व्यापारी जीएसटीच्या आघातामुळे अजूनही सावरले नाहीत.
नोटाबंदीतून सावरत नाही तोच सरकारने जीएसटी लादून दुसरा हल्ला केला. शेतकºयांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी मी कधीही पाहिलेला नाही.सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कर्जमाफीची बोगस माहिती दिल्याचा आरोप मुख्यमंत्री राष्ट्रीयकृत बँकांवर करत आहेत. अधिकारी ऐकत नाहीत म्हणून मुख्यमंत्री हताश झालेले दिसत आहेत. या परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना, युवकांना एकजुटीने सरकारला प्रतिकार करून सरकार खाली खेचल्याशिवाय आपली परिस्थिती बदलणार नाही. आज व्यापारी मंडळी ज्यांनी मोठ्या अपेक्षेने भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी मदत केली तो व्यापारी आज उद्ध्वस्त झाला आहे.’