पुण्याचा सिंहगड संघ सेवागिरी चषकाचा मानकरी-राज्यातील नामवंत ४२ संघांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:07 AM2019-01-10T00:07:09+5:302019-01-10T00:07:22+5:30
श्री सेवागिरी चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सडोली (कोल्हापूर)च्या छावा कब्बड्डी संघाने पुण्याच्या सिंहगड कबड्डी संघाचा पराभव करून ५१ हजारांच्या बक्षिसासह
पुसेगाव : श्री सेवागिरी चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सडोली (कोल्हापूर)च्या छावा कब्बड्डी संघाने पुण्याच्या सिंहगड कबड्डी संघाचा पराभव करून ५१ हजारांच्या बक्षिसासह सेवागिरी चषक पटकावला. स्पर्धेत नामवंत ४२ संघांनी सहभाग घेतला होता.
येथील शासकीय विद्यानिकेतनलगतच्या यात्रास्थळावर चार मैदानांवर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात आल्या. छावा कब्बडी संघ सडोली (प्रथम) सिंहगड कब्बडी संघ, पुणे (द्वितीय क्रमांक), शाहू कबड्डी संघ सडोली कोल्हापूर (तृतीय क्रमांक) तर कोल्हापूरच्या नवभारत कबड्डी संघाला चतुर्थ क्रमाकांचे बक्षीस मिळाले.
याशिवाय वैयक्तिक बक्षीस अंतर्गत अष्टपैलू खेळाडू-हृषीकेश गावडे, उत्कृष्ट चढाई-ज्ञानेश्वर पवार, उत्कृष्ट पकड-रुपेश थोरात, मॅन आॅफ द मॅच - शरद पवार याशिवाय उत्कृष्ट उजवा मध्यरक्षक, उत्कृष्ट डावा मध्यरक्षक, उत्कृष्ट उजवा कोपरा, उत्कृष्ट डावा कोपरा यांना रोख रुपयांची बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेसाठी कब्बडी खेळाडू शकुंतला खटावकर, नीलिमा कदम, वैभवराजे घाडगे, रोहित पवार, प्रा. उत्तमराव माने, संग्रामजित उथळे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सुरेश जाधव, मोहनराव जाधव, योगेश देशमुख, रणधीर जाधव, प्रताप जाधव, सुरेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांना मदनशेठ जाधव, अरुण मदने यांच्या हस्ते सेवागिरी चषकासह बक्षीस वितरण करण्यात आले.