पाचगणीत निर्बंध मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:40+5:302021-07-01T04:26:40+5:30
पाचगणी : कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाल्याने शासनाने सर्वसामान्य जनतेची आबाळ होऊ नये याकरिता कठोर निर्बंधामध्ये शिथिलता देऊन काही ...
पाचगणी : कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाल्याने शासनाने सर्वसामान्य जनतेची आबाळ होऊ नये याकरिता कठोर निर्बंधामध्ये शिथिलता देऊन काही अंशी व्यवहार सुरळीत केले. परंतु कोरोना नियम पाळणे सक्तीचे केले असतानाही लोक कोरोना नियमांना पायदळी तुडवीत आहेत. पाचगणी पोलिसांनी त्याविरुद्ध मोहीम राबवली. यामध्ये एका आठवड्यात १६१ घटनांमध्ये ६२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दंडात्मक कारवाई सुरू असतानाही लोक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. त्याचबरोबर इतरांनाही अडचणीत आणत आहेत. विनामास्क फिरणे, सुरक्षित अंतर न राखणे अशा घटना नित्य घडत असल्याने पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी कोरोना नियमांना अनुसरून कारवाई करीत आहेत. पाचगणी पोलिसांनी या विरोधात मोहीम आखली आहे. या कारवाई अंतर्गत विना मास्क फिरणाऱ्यांवर ६१ केसेस करण्यात आल्या आहेत. सुरक्षित अंतर न राखण्याच्या शंभर घटना घडल्या आहेत. अशा १६१ गुन्ह्यांतर्गत ६२ हजार २०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पाचगणी :
पाचगणी येथे विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली. (छाया : दिलीप पाडळे)