आठवडी बाजारात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:14 AM2021-02-21T05:14:43+5:302021-02-21T05:14:43+5:30

वडूज : कोरोना काळात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता वडूज नगर पंचायत प्रशासनाने आठवडी बाजारात व शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर ...

Punitive action against those who walk in the market without a mask | आठवडी बाजारात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

आठवडी बाजारात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Next

वडूज : कोरोना काळात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता वडूज नगर पंचायत प्रशासनाने आठवडी बाजारात व शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून पंधरा हजार पाचशे रुपये दंड वसूल केला.

आठवडी बाजार परिसरात मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या वडूज नगर पंचायत प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांची विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर संयुक्त कारवाई केली.

वडूज शहरातील आठवडी बाजार व महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. कोरोना विषाणू प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी व तो रोखण्यासाठी कडक पावले उचलावे लागत आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरिकांना वारंवार सूचना करूनदेखील उल्लंघन होत आहे, असे निदर्शनास आल्याने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी विनामास्क फिरणारे तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्यांना नागरिकांना दंड आकारण्यात आला. यामध्ये १५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ज्या नागरिकांनी अजूनही चाचणी केली नसेल त्यांनी तातडीने चाचणी करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले. पाचपेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी केली तर संबंधित दुकान तीन दिवस बंद व दंड आकारण्यात येईल.

आठवडी बाजारामध्येही नियमांची कडक अंमलबजाणी करण्यात आली. नागरिकांनी पूर्णपणे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन वडूज नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकरी माधव खांडेकर, कर निरीक्षक मकरंद जाधव, आरोग्य निरीक्षक राजेंद्र काटकर, लेखापाल सागर कुंभार, अभियंता संतोष कांबळे, विनया कांदळकर, विशाल बैले, मदन गोडसे, शिवाजी फडतरे, संदीप फडतरे, विजय शिंदे, धनाजी कांबळे, प्रसाद जगदाळे उपस्थित होते.

फोटो २०वडूज

वडूज येथील आठवडी बाजारात प्रशासनाच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. (छाया : शेखर जाधव)

Web Title: Punitive action against those who walk in the market without a mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.