नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर, पालिकेची दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:22 PM2020-07-24T12:22:53+5:302020-07-24T12:28:58+5:30
मास्क न वापरणारे व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने पुन्हा एकदा कारवाई मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी दुपारी अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी मार्केट यार्ड परिसरात तिघांवर कारवाई करून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला.
सातारा : मास्क न वापरणारे व सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने पुन्हा एकदा कारवाई मोहीम हाती घेतली आहे. अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी मार्केट यार्ड परिसरात तिघांवर कारवाई करून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने साताऱ्यातील अत्यावश्यक सेवा बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले आहेत.
सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत बाजारपेठेत गर्दी होत असून, किराणा दुकानाच्या बाहेर रांगा लागत आहेत. नागरिक व दुकानदारांकडून सोशल डिस्टन्सचे पालन केले जात नाही. शिवाय बहुतांश नागरिक मास्कचा वापरही करत नाहीत. त्यामुळे पालिकेने गुरुवारपासून पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे.
अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी मार्केट यार्ड परिसरात मास्कचा वापर न करणाऱ्या दोघांवर कारवाई करून संबंधितांकडून प्रति ५०० रुपयांचा दंड वसूल केला. तर सोशल डिस्टन्सप्रकरणी एका दुकानदारावर १ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. प्रशांत निकम यांनी आतापर्यंत सुमारे ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.