सोयाबीनची खरेदी व्यापाºयांकडून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:03 AM2017-10-09T00:03:07+5:302017-10-09T00:03:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : राज्य शासनाने सोयाबीनसह कडधान्य खरेदीसाठी हमीभावाचा फतवा काढला असून, हमी भाव आणि प्रत्यक्षात खुल्या बाजारातील दरामध्ये मोठी फारकत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून व्यापाºयांनी सोयाबीनची खरेदी पूर्णत: बंद केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येणाºया शेतकºयांमध्ये निराशेचे वातावरण असून, त्यांची दिवाळी यंदा अंधारातच साजरी होण्याची दाट शक्यता आहे. शासनाच्या या निर्णयाचा फटका वाहनधारकांबरोबरच हमाल-मापाड्यांना देखील बसला आहे.
पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कडधान्यांसाठी हमी भाव जाहीर केले असून, पणन खात्याला त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी सर्व सहायक निबंधकांना सूचना देऊन बाजार समित्यांमार्फत हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यासाठी व्यापाºयांना नोटीस बजावण्याचे आदेश काढले. कोरेगावात बाजार समितीने शनिवारीच या आदेशाचे पालन करत तातडीने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, वस्तूस्थिती वेगळीच निघाली. हमी भावाचा शासनाचा फतवा निघाल्यामुळे व्यापाºयांनीच अगोदरपासून खरेदी अघोषित काळासाठी बंदच केली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दसºयापासून शेतकरीवर्ग सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणतात, बाजारपेठेतील दराप्रमाणे त्याची विक्री केली जाते आणि त्यातून दिवाळीची खरेदी केली जाते. यावर्षी शासनाने हमीभावाचा फतवा काढला, तो काढत असताना बाजारपेठेतील परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास केलेला दिसत नाही. स्थानिक व्यापारी सोयाबीनची खरेदी करून ते मिलमध्ये पाठवतात, तेथे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. विशेषत: सोयाबीन तेलासाठी
त्याचा सर्वाधिक वापर होतो.
प्रत्यक्षात मिलला आयात केलेले कच्चे सोयाबीन तेल स्वस्तात
मिळत असल्याने ते स्थानिक
सोयाबीन खरेदीकडे लक्ष देत नाहीत. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे.
गेल्या आठवड्यात २६०० ते २७५० रुपये प्रती क्विंटल सोयाबीनचा स्थानिक बाजारपेठेत दर होता. कोरेगावसह तालुक्यात खरेदी करण्यात येणारे सोयाबीन हे जास्त करून मिल्सला विकले जाते. या मिल्समध्ये असलेल्या आधुनिक मशिनरीच्या माध्यामतून आर्द्रता, माती व बारदान आदींची वजावट करून व्यापाºयांना दर दिला जातो. मिल्सचे आणि स्थानिक बाजारपेठेतील दरात केवळ ३० ते ४० रुपयांचा
फरक राहतो, असे असताना शासनाने अचानक २८५० मूळ भाव व त्यावर २०० रुपये बोनस असा ३०५० रुपयांचा हमीभाव जाहीर
केल्याने व्यापाºयांची बोबडीच वळाली आहे. सोयाबीनच नव्हे तर अन्य कडधान्यांसाठी हमीभाव जाहीर केल्याने त्यांची खरेदी करणे व्यापाºयांना दुरापस्त झाले आहे.
शेतकरी, बाजार समिती आणि पणन खात्याशी वादविवाद होण्यापेक्षा व्यापाºयांनी तूर्तास सोयाबीन खरेदी पूर्णत बंद केली आहे. व्यापाºयांच्या या पवित्र्यामुळे थेट बाजार समितीच्या उत्पन्नावर देखील परिणाम होत असून, हमाल व मापाड्यांना काम राहिलेले नाही. ग्रामीण भागातून सोयाबीनची वाहतूक करणाºया वाहनधारकांना देखील त्याचा फटका बसला आहे.