पुसेगावनगरीत लोटला भक्तीचा सागर

By admin | Published: July 5, 2015 09:48 PM2015-07-05T21:48:55+5:302015-07-06T00:24:57+5:30

महायज्ञ सोहळ्यास प्रारंभ : मिरवणुकीत हत्ती, घोडे, वारकऱ्यांसह विद्यार्थ्यांचा सहभाग

Pusgevanavant Lot's fame sea | पुसेगावनगरीत लोटला भक्तीचा सागर

पुसेगावनगरीत लोटला भक्तीचा सागर

Next

पुसेगाव : विश्वशांती व विश्वकल्याणासाठी येथील सेवागिरी देवस्थान टस्ट्रतर्फे रविवारपासून सात दिवस चालणाऱ्या एकादश कुंडी अतिरूद्र स्वाहकार जप अनुष्ठान महायज्ञाला शोभायात्रेने प्रारंभ झाला. या सोहळ्यानिमित्त पुसेगावनगरीत भक्तीचा सागर लोटला होता. घरोघरी अंगणात सडा टाकून रांगोळी काढण्यात आली होती. तसेच गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी ९ वाजता श्री सेवागिरी मंदिरात करवीर पीठाचे श्री शंकराचार्य यांच्या हस्ते सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आ. शशिकांत शिंंदे, आ. प्रभाकर घार्गे, आ. जयकुमार गोरे, विलासराव उंडाळकर, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव उपस्थित होते.सकाळी साडेनऊ वाजता रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. बँड पथक, हत्ती, घोडे अग्रभागी असलेल्या या मिरवणुकीत विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. डोक्यावर तुलसीवृंदावन व कलश घेतलेल्या पंचक्रोशीतील महिला, तसेच नागरिक, भाविक हरिनामाचा गजर करत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यज्ञाचे पौरोहित्य नंदकुमार जोशी करणार आहेत. (वार्ताहर)


महिलांच्या ओव्या अन् वारकऱ्यांची फुगडी
शिवाजी चौकात विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर केले. वारकऱ्यांनी ग्यानबा तुकारामांच्या जयघोषात भव्य रिंंगण केले. महिलांच्या भक्तिमय ओव्यांच्या सुरावटीत वारकरी फुगड्या खेळले. या महायज्ञ सोहळ्यासाठी सर्व ग्रामदेवतांना निमंत्रित करून रथ पुन्हा गावाला वळसा घालून साडेबाराच्या दरम्यान मंदिरात पोहचला. त्यानंतर महायज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला.

Web Title: Pusgevanavant Lot's fame sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.