सातारा जिल्ह्यात गावकारभा-यांना धक्का !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:04 PM2017-10-17T12:04:42+5:302017-10-17T12:09:09+5:30

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागत असून अनेक ठिकाणी परिवर्तन झाले आहे. माण तालुक्यातील मलवडीत दोन्ही गोरे बंधुंना धक्का देत अपक्ष उमेदवाराने सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिरवळमध्येही भाजपच्या लक्ष्मी पानसरे विजयी झाल्या असून भुर्इंजमध्ये काँग्रेसने गड राखला आहे. वरकुटे मलवडीत भाजपच्या उमेदवारांचा झेंडा फडकला आहे.

Push to Gaokkarabha in Satara district! | सातारा जिल्ह्यात गावकारभा-यांना धक्का !

सातारा जिल्ह्यात गावकारभा-यांना धक्का !

Next
ठळक मुद्देशिरवळमध्ये भाजपचं कमळ फुललं..मलवडीत गोरे बंधुंना सारुन अपक्षाचा विजय किकलीत २५ वर्षांनंतर सत्तांतर

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागत असून अनेक ठिकाणी परिवर्तन झाले आहे. माण तालुक्यातील मलवडीत दोन्ही गोरे बंधुंना धक्का देत अपक्ष उमेदवाराने सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिरवळमध्येही भाजपच्या लक्ष्मी पानसरे विजयी झाल्या असून भुर्इंजमध्ये काँग्रेसने गड राखला आहे.  
माण तालुक्यात महिमानगडमध्ये राष्ट्रवादीच्या संगिता मदने सरपंच म्हणून विजयी झाल्या असून राष्ट्रवादीने ही ग्रामपंचायत राखली आहे. तसेच पाचवड, मनकर्णवाडी, पांढरवाडी याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. वावरहिरे, परकंदी, कासारवाडी, खुटबाव, महाबळेश्वरवाडी, नरवणे आदी गावांत काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. आंधळीत काँग्रेसच्या मिनाक्षी काळे विजयी झाल्या आहेत. पांगरीत काँग्रेसचे दिलीप आवळे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले आहेत. 
शिरवळमध्ये राष्ट्रवादीची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली असून भाजपच्या लक्ष्मी पानसरे सरपंच म्हणून निवडल्या गेल्या आहेत. तसेच आसवलीमध्येही सत्तांतर झाले आहे. भुर्इंजमध्ये काँग्रेसला नऊ तर राष्ट्रवादीला पाच जागा सुरूवातीच्या टप्प्यात मिळाल्या आहेत. कवठेत राष्ट्रवादी सहा तर काँग्रेस पाच तर श्रीकांत वीर सरपंचपदी विराजमान झाले आहेत.  काळंगवाडीत सरपंचपदासाठी समान मते पडली असून काँग्रेस व इतर पाच जागांवर असून राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. किकलीमध्ये भाजपसह इतर जवळपास इतर नऊ जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादीला २५ वर्षांनंतर प्रथमच पराभव पत्करावा लागला आहे. 
खटाव तालुक्यात खातवळ येथे शिवसेनेच्या रेखा फडतरे सरपंच झाल्या असून राजाचे कुर्लेमध्ये समरजित राजेभोसले विजयी झाले आहेत. ललगुणमध्ये काँग्रेस-भाजपचे जयवंत गोसावी यांना गुलाला लागला आहे. तसेच फलटण तालुक्यात पिंपरद, ताथवडा अन् चव्हाणवाडीत काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. 

आदर्की खुर्दमध्ये सौरभ निंबाळकर सरपंच झाले असून संजय व दिवाकर निंबाळकर गटाला सहा तर विश्वासराव निंबाळकर गट तीन जागा मिळाल्या आहेत.

Web Title: Push to Gaokkarabha in Satara district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.