खटाव तालुक्यात त्वरित जम्बो कोविड सेंटर उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:59+5:302021-06-11T04:26:59+5:30

औंध : खटाव तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी तसेच रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी त्वरित जम्बो कोविड सेंटर उभारण्याची ...

Quickly set up Jumbo Covid Center in Khatav taluka | खटाव तालुक्यात त्वरित जम्बो कोविड सेंटर उभारा

खटाव तालुक्यात त्वरित जम्बो कोविड सेंटर उभारा

googlenewsNext

औंध : खटाव तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी तसेच रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी त्वरित जम्बो कोविड सेंटर उभारण्याची मागणी हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकारी शेखरसिंह गुरुवारी खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी रणजितसिंह देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन तातडीने जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. यावेळी काँग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, अशोकराव गोडसे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

खटाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे त्याचबरोबर कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. याठिकाणी मायणी येथे फक्त चार व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत तसेच ऑक्सिजन सुविधा खटाव तालुक्यात अपुरी आहे.

त्यामुळे सातारा, कऱ्हाड, कोरेगाव येथे उपचार करण्यासाठी रुग्णांना जावे लागत आहे तरी कोरोना रुग्णांचे हाल रोखण्यासाठी त्वरित खटाव तालुक्यात कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी रणजितसिंह देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली.

फोटो:-खटाव तालुक्यात त्वरित जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी रणजितसिंह देशमुख यांचेसह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांचेकडे केली.

Web Title: Quickly set up Jumbo Covid Center in Khatav taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.