कोटा फुल्ल नाही; लायसन्स बाद होण्याची तर भीतीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:43 AM2021-09-22T04:43:45+5:302021-09-22T04:43:45+5:30

सातारा : मुदत संपलेले लर्निंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग यांसह इतर कामांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ...

The quota is not full; There is no fear of losing your license! | कोटा फुल्ल नाही; लायसन्स बाद होण्याची तर भीतीच नाही!

कोटा फुल्ल नाही; लायसन्स बाद होण्याची तर भीतीच नाही!

Next

सातारा : मुदत संपलेले लर्निंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग यांसह इतर कामांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ३० सप्टेंबरपर्यंतचा कोटा फुल्ल होईल, अशी चिंता मात्र साताऱ्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नाही. त्यामुळे कोणाचे लर्निंग लायसन्स बाद होणार नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून सांगण्यात आले.

मुदत संपल्यानंतर लायसन्स बाद होऊ नयेत म्हणून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रोज जास्तीत जास्त लायसन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कार्यालयाचा कोटा २१० आहे. तर महिन्याकाठी १४० ते १५० कॅम्पचे आयोजन केले जाते. त्यामुळे यामधून परवाने तातडीने दिले जात आहेत.

कोरोनामुळे सलग काही महिने शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे साहजिकच कोणतेही कामे होत नव्हती. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातही हीच परिस्थिती होती. नागरिकांना लायसन्स काढता येत नव्हते. त्यामुळे लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेकांनी लायसन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात धाव घेतली. सध्या ऑनलाइन प्रक्रिया सुरू असल्यामुळे अनेकांनी लायसन्स काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, ठरलेला कोटा फुल्ल होइल, अशी धास्ती जरी नागरिकांना असली तरी सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कोटा फुल्ल झाला नसून, कोणाचेही लायसन्स बाद होणार नाही. मात्र, नागरिकांनी काही अडचणी असल्यास तत्काळ कार्यालयाशी संपर्क साधावा.

चाैकट : काय होत्या अडचणी..

१) लाॅकडाऊनमुळे सर्व कामे पेंडिंग होती

२) एका दिवसात एका इन्स्पेक्टरकडे ३५ वाहन परवाने देण्याचा कोटा असतो. त्यामुळे ही कोटा सिस्टिम लायसन्सच्या दिरंगाइला कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.

३) अधूनमधून सर्व्हर डाऊन झाल्यामुळे लायसन्ससाठी विलंब

चाैकट : तारीख मिळालेलेे येत नाहीत

लायसन्स काढण्याची मिळाली असतानाही अनेकजण ही विसरून जातात. काही वेळेला कामाच्या व्यापामध्ये त्यांना लायसन्स काढण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तारीख उलटून गेल्यानंतर मग नाइलाजास्तव लर्निंग लायसन्स बाद केले जाते.

चाैकट : राेजचा कोटा २१० चा

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये राेजचा कोटा २१० चा आहे. असे असले तरी कॅम्पचे आयोजन करून कोटा वाढविला जातो. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत.

कोट : लायसन्स नव्याने काढावे लागणार, असे वाटत होते. मात्र, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ ऑनलाइन प्रक्रिया करून परवाना दिला. त्यामुळे नव्याने लायसन्स काढावे लागणार नाही.

सूरज जाधव, कृष्णानगर, सातारा

कोट : लर्निंग लायसन्सची कामे तातडीने केली जात आहेत. ३० सप्टेंंबरची मुदत असली तरी आपल्याकडे लायसन्स बाद होण्याची भीती नाही. काही अडचणी असल्यास नागरिकांनी कार्यालयाशी संपर्क करावा.

विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

Web Title: The quota is not full; There is no fear of losing your license!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.