आर. के. मरिनच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:44+5:302021-02-23T04:57:44+5:30
कऱ्हाड : मर्चंट नेव्ही अधिकारी प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन करणाऱ्या येथील आर. के. मरिन करिअर ॲकॅडमीच्या नूतन वातानुकूलित अद्ययावत डिजिटल कार्यालयाचे ...
कऱ्हाड : मर्चंट नेव्ही अधिकारी प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन करणाऱ्या येथील आर. के. मरिन करिअर ॲकॅडमीच्या नूतन वातानुकूलित अद्ययावत डिजिटल कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते झाले.
ॲकॅडमीचे संचालक राहुल खडके यांनी कार्यालयाचे उद्घाटन आई इंदुमती व वडील सेवानिवृत्त नायब तहसीलदार विठ्ठलराव खडके यांच्या हस्ते केले. यावेळी कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुकुंद चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, दिलीप चव्हाण, यशवंत बॅंकेच्या मुख्याधिकारी वैशाली मोकाशी, राहुल बोराटे, सीमा खडके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नूतन कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सुप्रजा खडके हिने जाणता राजा महानाट्यातील भवानी आवाहनाने केली तर तेजस्वी माने याने सादर केलेल्या अफझलखान वधाच्या पोवाड्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे म्हणाल्या, कऱ्हाडसारख्या ठिकाणी नूतन वास्तूमध्ये सुरु होणाऱ्या या ॲकॅडमीचा तरुणांना करिअरसाठी मोठा फायदा होणार आहे. राहुल खडके यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात नवे दालन उपलब्ध करुन दिले आहे. त्याचबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. उद्योग क्षेत्रातही सातासुमुद्रापार त्यांचे कार्य पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कोमल कुंदप व विद्या मोरे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वा प्र )
चौकट:
राज नक्षत्र संकुलाच्या आवारात हा दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावरील आकर्षक शिवरायांची मूर्ती व भवानी तलवारीची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
फोटो : कऱ्हाड येथे आर. के. मरिन ॲकॅडमीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन इंदुमती खडके व विठ्ठलराव खडके यांच्या हस्ते झाले. यावेळी राहुल खडके व मान्यवर उपस्थित होते.
फोटो 22pamod 03