जिल्ह्यात रब्बीची दोन लाख हेक्टरवर पेरणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:32 AM2021-01-04T04:32:06+5:302021-01-04T04:32:06+5:30

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र वाढले असून आतापर्यंत १ लाख ९७ हजार हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. ...

Rabi sowing on two lakh hectares in the district! | जिल्ह्यात रब्बीची दोन लाख हेक्टरवर पेरणी !

जिल्ह्यात रब्बीची दोन लाख हेक्टरवर पेरणी !

Next

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र वाढले असून आतापर्यंत १ लाख ९७ हजार हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. ऐकूण क्षेत्राच्या ९० टक्के पेर पूर्णत्वाकडे गेली आहे, तर गहू ३१ आणि हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र २६ हजार हेक्टरवर गेले आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १५ हजार हेक्टर होते. यंदा मात्र, क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार २ लाख १९ हजार ११९ हेक्टर क्षेत्र रब्बीचे आहे. यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक १ लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. यानंतर गहू क्षेत्र ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात करडई, सूर्यफूल, तीळ, जवस पिकाचेही अत्यल्प क्षेत्र आहे.

जिल्ह्यात यावर्षी पेरणीला वेळेत सुरूवात झाली. पण, दोनवेळा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणीला ब्रेक लागला होता. असे असले तरी सद्यस्थितीत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९७ हजार २१ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ८९.९२ आहे, तर जिल्ह्यात रब्बीत सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे सर्वसाधारणपणे १ लाख ३९ हजार २०० हेक्टर आहे. १ लाख २६ हजार ८३६ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ९१.१२ आहे, तर जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड, सातारा, जावळी या तालुक्यातही ज्वारीचे क्षेत्र आहे.

जिल्ह्यात गव्हाची आतापर्यंत ३१ हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ९०.६१ टक्क्यांवर ही पेरणी आहे, तर मक्याची १० हजार ६३५ आणि हरभऱ्याची २६ हजार ८६४ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. मक्याची ८७ आणि हरभऱ्याची पेरणी ८८ टक्क्यांवर झालेली आहे.

माणमध्ये १०१ टक्के क्षेत्रावर पेरणी...

जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस होता, तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी झाला. त्यामुळे पेरण्यांना उशीर झालेला. तसेच रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्रही कमी होते. यंदा मात्र, वाढ झालेली आहे. माणमध्ये यंदा रब्बीच्या सर्वसाधारण क्षेत्रात ११ हजार तर फलटण तालुक्यात १२ हजार हेक्टरने वाढ झाली. तसेच खटाव तालुक्यातही ८ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र वाढलेले आहे. माणमध्ये यंदा १०१ टक्के, खटाव ८९.६५ आणि फलटण तालुक्यात ८१ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झालेली आहे.

.....................................................

Web Title: Rabi sowing on two lakh hectares in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.