जातिवाचक शिवीगाळ ; दहा जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 07:15 PM2020-03-03T19:15:29+5:302020-03-03T19:17:41+5:30
सातारा येथील कंरजे पेठ परिसरात असलेल्या सार्वजनिक लाईटची नासधूस करून जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून दहा युवकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : येथील कंरजे पेठ परिसरात असलेल्या सार्वजनिक लाईटची नासधूस करून जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून दहा युवकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
रविराज किर्दत, सिध्दांत किर्दत, ओंकार किर्दत, अजिंक्य किर्दत, अभय किर्दत, साहिल किर्दत व चार अनोळखी (सर्व रा. करंजे पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मिलिंद लक्ष्मण गायकवाड (रा. करंजे पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ रोजी रात्री वरील संशयितांनी बुध्द विहार परिसरातील रस्त्यारील सार्वजनिक लाईटची तोडफोड करून रस्त्याकडेला असलेल्या चारचाकी गाडीचीही तोडफोड केली होती. त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून संबंधितांनी जातिवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याचे मिलिंद गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी करंजे येथे भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली.
म्हसवे येथे ट्रॅक्टर विक्रेत्याची फसवणूक
सातारा : म्हसवे, ता. सातारा येथील ट्रॅक्टर विक्रेते सूर्यकांत माधवराव कदम (वय ४८) यांची एकाने फसवणूक केली असून, संबंधितावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
समीर अब्दुलगनी इनामदार (रा. ओझर्डे, ता. वाई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सूर्यकांत कदम यांचे म्हसवे येथे ट्रॅक्टर विक्रीचे शोरुम आहे. या शोरुममधून इनामदार याने काहीमहिन्यांंपूर्वी जुना ट्रॅक्टर चार दिवस वापरून परत आणतो, असे सांगून ट्रॅक्टर घेऊन गेला. मात्र, त्याने ट्रॅक्टर परत केला नाहीच शिवाय परस्पर व्यवहार करून विक्री केल्याचेही कदम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.