साताऱ्यात शाळा दुरुस्तीच्या वेळी राडा; नऊ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 04:16 PM2023-06-03T16:16:12+5:302023-06-03T16:17:07+5:30
शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना बेकायदा जमाव जमवून दांडक्याने मारहाण
सातारा : शहरातील एका शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना बेकायदा जमाव जमवून दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नऊ जणांच्या विरोधात दुखापतीसह मारहाणीचा गुन्हा नोंद झालेला आहे.
याप्रकरणी मंदार वैजनाथ संत (रा. म्हसवे, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनंतर जाॅन फिलीप भांबळ, सुहास साळवे, अनुग्रह पवार, वंदना घाडगे, यहोशिवा साळवे, संदेश घाडगे, नीलेश घाडगे, शरद गायकवाड आणि शिल्पा साळवे (पूर्ण नाव पत्ता नाही.) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
१ जून रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. शाळेच्या आवारात दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी संशयितांनी बेकायदा जमा जमवला. तसेच अनधिकारपणे संबंधित जागेत प्रवेश करून कंपाउंडच्या पत्र्याचे गेट तोडले. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. ट्रॅक्टरवर दगड मारण्यात आले. या घटनेत नुकसान करण्यात आले, असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे, असे पोलिसांनी सांगितले.