फायनान्स कार्यालयात राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:30 PM2017-08-03T23:30:55+5:302017-08-03T23:31:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : येथील दिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे कार्यालय गुरुवारी सकाळी रणरागिणींनी फोडले. ‘मनसे’च्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयाची तोडफोड करीत अधिकाºयांच्या तोंडाला काळे फासले. तसेच संबंधित अधिकाºयाला गाढवावर बसविण्यात आले.
ग्रामीण भागातील गरजू, गरीब महिलांना मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून अनेक कंपन्या अर्थपुरवठा करीत आहेत. मात्र, त्यांच्या वसुलीची पद्धत महिलांना जेरीस आणणारी आहे. कर्ज घेतलेल्या अनेक महिला हप्ते भरून कंटाळल्या तरी कर्ज फिटत नाही. या परिस्थितीने महिला बेजार झाल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपनीच्या नावाखाली सुरू असणाºया या सावकारीला चाप लावण्यासाठी मनसेचे संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात व्यापक आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकाºयांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांना वसुलीबाबत काही सूचना केल्या आहेत.
‘मनसे’च्या आठ पदाधिकाºयांना अटक
दिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे ट्रान्जक्शन आॅफिसर वैभव काशीनाथ कांबळे
(रा. शिरवडे, ता. कºहाड) यांनी याबाबतची फिर्याद कºहाड शहर पोलिसांत दिली आहे. त्यानुसार मनसेचे जिल्हा संघटक मनोज माळी (रा. करवडी), जिल्हा सचिव सागर पवार (रा. पिंपरी, ता. कोरेगाव), मनोज सदाशिव माळी (रा. मसूर), स्वराज्य प्रतिष्ठानचे मधुकर जाधव (रा. दिवशी बुद्रुक, ता. पाटण), भानुदास डार्इंगडे (रा. कापिल), स्वाती धनंजय माने (रा. नांदलापूर), मनीषा युवराज चव्हाण (रा. निसरे, ता. पाटण) व भारती भगवान गावडे (रा. वाठार) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या आठजणांना अटक केली आहे. संशयितांनी कार्यालयात तोडफोड करून १ लाख २५ हजारांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अधिकाºयाला बसविले गाढवावर
कºहाड येथे दिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे एक कार्यालय आहे. या ठिकाणी असलेल्या कार्यालयातून शहरातील तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गरजू महिला तसेच बचतगटांना अर्थसाहाय्य केले जाते. येथील कार्यालयातील अधिकाºयांनीही तालुक्यातील महिलांना अर्थसाहाय्य केले होते. देण्यात आलेल्या पैशांचे हप्ते जेव्हा वसूल करण्याची वेळ आली तेव्हा कंपनीच्या प्रतिनिधींनी महिलांना नाहक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून अखेर मनसेचे जिल्हा संघटक मनोज माळी यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी कंपनीच्या अधिकाºयांना कार्यालयातून खुर्चीवरून थेट गाढवावर बसविले.