पाचगणीतील अंधाराला कंटाळून पर्यटकांनी ठोकला रामराम !

By admin | Published: June 26, 2015 10:00 PM2015-06-26T22:00:34+5:302015-06-26T22:00:34+5:30

जोरदार पाऊस : चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

Raghuram bumped in the fifth house in the fifth heaven! | पाचगणीतील अंधाराला कंटाळून पर्यटकांनी ठोकला रामराम !

पाचगणीतील अंधाराला कंटाळून पर्यटकांनी ठोकला रामराम !

Next

पाचगणी : गेल्या चार दिवसांपासून येथील वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिक व पर्यटकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. नागरिकांसह पर्यटकांना अंधाराचा सामना करावा लागला. तसेच येथे आलेले अनेक पर्यटक पाचगणी सोडून गेले.
पाचगणी व महाबळेश्वर ही जागतिक पर्यटन स्थळे असून, या ठिकाणी पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी अनेक हौशी पर्यटक येतात. पाचगणीत गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे तोडणे आणि तारांवर लटकणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम वीज वितरणकडून केले जाते; परंतु गेल्या दोन वर्षांपासून या कामाकडे कोणीच लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. परिणामी वादळी वाऱ्याने विद्युतवाहिन्यांवर फांद्या पडून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. आजही कित्येक ठिकाणी विजेच्या तारांवर धोकायदायकरीत्या लटकत असलेल्या फांद्या दिसत आहेत. कित्येक ठिकाणी विजेच्या खांबावर वेलींचे साम्राज्य आहे. या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.गेले चार दिवस सायंकाळपासूनच पाचगणीची संपूर्ण बाजारपेठ अंधारात गडप होत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळत नाही. वीज नसल्याने बोअरवेलच्या मोटार बंद आहेत. अशा अनेक समस्यांना नागरिकांना व व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एवढे असूनही वीजवितरण कंपनीचा कारभार सुस्तावला आहे. अपुरे कर्मचारी आणि कामचा विस्तार पाहता वरिष्ठांनी जादा कर्मचारी किंवा खासगी माणसे घेऊन काम करणे गरजेचे असूनही अधिकारी कानाडोळा करत आहेत. याबद्दल संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)


अन् शुक्रवारी रात्री वीज आली...
झाडे खडसणे आणि बुंध्यात सडलेली झाडे तोडण्यास प्रशासन परवानगी देत नसल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल केलेल्या अर्जाचा प्रशासनाने आणि हाय मॉनिटरिंग कमिटीने त्वरित निपटारा करून झाडे तोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा शुक्रवारी रात्री पूर्ववत झाला.

Web Title: Raghuram bumped in the fifth house in the fifth heaven!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.