कऱ्हाडमध्ये अन्न औषधची पाच ठिकाणी छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 09:59 PM2018-10-09T21:59:07+5:302018-10-09T22:00:26+5:30
दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश व्यापारी खाद्यतेलात भेसळ करत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाल्यानंतर टीमने कºहाड येथे सहा ठिकाणी छापे टाकले.
सातारा : दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश व्यापारी खाद्यतेलात भेसळ करत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाल्यानंतर टीमने कºहाड येथे सहा ठिकाणी छापे टाकले. यामध्ये सुमारे १६ लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, साताऱ्यातील काही व्यापारीही रडावर असून, येत्या दोन दिवसांतच अचानक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
कºहाडमधील मधूर ट्रेडर्स, मार्केट यार्डमधील दुकानांमध्ये ३३८७४ किलो साठा, मे. गणेश ट्रेडर्स, मलकापूर, ता. कºहाड येथे ९५२१.१ किलो साठा, मे. सिद्धेश्वर आॅईल इंडस्ट्रीज, मार्केट यार्ड-११७४८ किलो, मे. शिवलिंग नागाप्पा घेवारी, मार्केट यार्ड, कºहाड-२४७०९.४ किलो साठा, मे. मधूर एंटरप्रायजेस, मार्केट यार्ड ता. कºहाड-२०८०३.६ किलो असा सुमारे १६ लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
खाद्यतेल भेसळीच्या संशयावरून, तेल चाचणीकरिता अद्ययावत प्रयोगशाळा नसल्याचे आढळून आल्याने तसेच जुन्या डब्यांचा वापर करीत असल्याचा आणि खाद्यतेल खरेदी व विक्री केल्याचे तपशील सादर न केल्याचा ठपका या व्यापाºयांवर ठेवण्यात आला आहे.