जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:41 AM2021-04-02T04:41:59+5:302021-04-02T04:41:59+5:30

फलटण : फलटण शहरात पोलिसांनी विविध ठिकाणी जुगार व मटका अड्ड्यावर छापे टाकून रोख २३ हजार रकमेसह साहित्य जप्त ...

Raids on gambling dens; Nine people in custody | जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जण ताब्यात

जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जण ताब्यात

Next

फलटण : फलटण शहरात पोलिसांनी विविध ठिकाणी जुगार व मटका अड्ड्यावर छापे टाकून रोख २३ हजार रकमेसह साहित्य जप्त केले. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तेली गल्ली शुक्रवार पेठ (ता. फलटण) येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून २१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल फलटण शहर पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तेली गल्ली शुक्रवार पेठ (ता. फलटण) येथील हनुमंत गगतीरे (रा. मारुती मंदिर, फलटण) याने स्वतःच्या राहत्या घरात जुगाराचा डाव रंगवला. फलटण शहर पोलिसांनी धाड टाकून घरमालक हनुमंत गगतीरेसह सचिन सुभाष चव्हाण (३७, रा. लक्ष्मीनगर फलटण), बाळू हनुमंत काळे (५४, रा. दत्तनगर, फलटण), मुस्ताक मेहबूब शेख (५८, रा. कसबा पेठ, फलटण), मुनीर अहमद महात (४८, रा. फलटण), अखील बसू शेख (४८, रा. लक्ष्मीनगर फलटण), गिरधारी मोहनलाल लोहाना (५४, रा. मारवाड पेठ फलटण) यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

दुसऱ्या कारवाईत महात्मा फुले मंडई येथे अभिजीत बार शेजारी मोकळ्या जागेत लोकांचेकडून पैसे घेऊन ऑनलाइन गेम/चक्री नावाचा जुगार चालवीत असताना १ हजार ७० रुपयांचे साहित्यासह मिळून आलेल्या सुनील मोतीराम पवार (३८, रा. बुधवार पेठ फलटण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या कारवाईत रविवार पेठ बसस्टँडसमोर भवानी मार्केट येथे भिंतीलगत सूरज दिलीप काकडे (३२ रा. मंगळवार पेठ फलटण) हा मटका घेताना ८४० रुपयांची रोकड रक्कम व साहित्यासह मिळून आला. म्हणून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस हवालदार ठाकूर यांनी केली. केलेली असून पुढील तपास हवालदार काकडे हे करीत आहेत.

Web Title: Raids on gambling dens; Nine people in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.