नहरवाडीत रेल्वेच्या धडकेत मजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 11:28 IST2019-04-17T11:27:01+5:302019-04-17T11:28:07+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नहरवाडी गावच्या हद्दीत रेल्वे गेट नंबर ८३ जवळ रेल्वे रूळ देखभालीचे काम करणाºया मजुराला ...

नहरवाडीत रेल्वेच्या धडकेत मजूर ठार
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नहरवाडी गावच्या हद्दीत रेल्वे गेट नंबर ८३ जवळ रेल्वे रूळ देखभालीचे काम करणाºया मजुराला रेल्वेने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात झाली आहे.उमेशकुमार धुलीराम दुर्या (वय २०, मु. चटुवा, डिंडोरी, मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी नहरवाडी गावच्या हद्दीत रेल्वे गेट नंबर ८३ जवळ दि. १६ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या पूर्वी उमेशकुमार दुर्या या मजुराला रेल्वेने धडक दिली. धडक एवढी भीषण होती की उमेशकुमार यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन तो जागीच ठार झाला. उमेशकुमार यांच्यासह त्याच गावचे सुमारे पंचवीस मजूर तारगाव - रहिमतपूर या दरम्यानच्या रेल्वे रुळांच्या देखभालीचे काम रेल्वे कॉन्ट्रॅक्टर रामकृष्ण यांच्याकडे करत होते. याबाबतची फिर्याद सुपरवाझर शब्बीर शाकीर मुल्ला (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय जाधव अधिक तपास करत आहेत.