संपादित होणाऱ्या जमिनीचा रेल्वेचा शेतकऱ्यांना पाचपट मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 02:25 PM2021-07-31T14:25:02+5:302021-07-31T14:38:31+5:30

Railway Karad Satara : पार्ले, बाबरमाची, सयापूर, यशवंतनगर, शिरवडे या कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीरणामध्ये संपादित होणाऱ्या जमिनिचा बाजारभावाच्या पाचपट बागायती जमिनीप्रमाने मोबदला देण्यात आला आहे. कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते पार्ले येथील शेतकऱ्यांना मोबदल्याच्या धनादेशाचे नुकतेच वितरण करण्यात आले.

Railways pays farmers five times as much | संपादित होणाऱ्या जमिनीचा रेल्वेचा शेतकऱ्यांना पाचपट मोबदला

संपादित होणाऱ्या जमिनीचा रेल्वेचा शेतकऱ्यांना पाचपट मोबदला

googlenewsNext
ठळक मुद्देसंपादित होणाऱ्या जमिनीचा रेल्वेचा शेतकऱ्यांना पाचपट मोबदलाचांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी व्यक्त केला आनंद

कऱ्हाड : पार्ले, बाबरमाची, सयापूर, यशवंतनगर, शिरवडे या कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरणामध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा बाजारभावाच्या पाचपट बागायती जमिनीप्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते पार्ले येथील शेतकऱ्यांना मोबदल्याच्या धनादेशाचे नुकतेच वितरण करण्यात आले.

यावेळी रेल्वे आंदोलनाचे शेतकरी नेते सचिन नलवडे, प्रकल्प बाधित शेतकरी दिनकर नलवडे, भीकू नलवडे, तुकाराम नलवडे, भीमराव पाटील, रामचंद्र जाधव, संजय नलवडे, तानाजी जाधव, अशोक नलवडे, तानाजी नलवडे, शिवाजी नलवडे, विनोद नलवडे, संतोष नलवडे, सनी नलवडे, सचिन पाटिल उपस्थित होते.

गेल्या तीन वर्ष्यापासून शेतकऱ्यांचा रेल्वे प्रशासनाविरोधात लढा सुरु होता. शेतकऱ्यांना मोबदला न देता रेल्वे विभागाने विविध ठिकाणी कामे सुरु केली होती. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रेल्वेच्या हद्दीचे खांब उभे केले होते.

शेतकऱ्यांची जमीन आमचीच असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत होते. यावेळी शेतकऱ्यांना सोबत घेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे त्यावेळचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे यांना सोबत घेवून शेतकऱ्यांनी मोठा लढा उभा केला. रेल्वेची विना मोबदला सुरु असलेली कामे सचिन नलवडे यांनी बंद केली होती.

त्यानंतर तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले, जिल्ह्याधिकारी श्वेता सिंघल, प्रांत हिम्मत खराडे, भुसंपादन शाखेचे दिनकर ठोंबरे व रेल्वे अधिकारी यांची शेतकऱ्यांसोबत बैठक होवून शेतकऱ्यांच्या जमीनी सातबाऱ्याप्रमाणे मोजन्याचे ठरले .

त्यानुसार कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करण्यात आली. मोजणी मध्ये रेल्वेच्या प्रस्तावातील जमिनीच्या क्षेत्रफळा पेक्षा जास्त जमीन रेल्वेसाठी संपादित होत असल्याचे निदर्शनास आले.

कऱ्हाड तालुक्यातील गावातील सर्व शेतकऱ्यांना नुकतेच वाढीव क्षेत्रासह बाग़ायती जमिनीप्रमाणे बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळला आहे. जमिनीला पाच लाख, दीड लाख रुपये गुंठा प्रमाणे तर बाधित होणाऱ्या फळ झाडाना पुढील पिक गृहीत धरून मोबदला मिळाला आहे. घर, शेड, विहीर यालाही शासन निर्णया नुसार चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Web Title: Railways pays farmers five times as much

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.