साताºयात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 01:56 PM2017-10-10T13:56:23+5:302017-10-10T13:56:51+5:30

साताºयात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा रतीब सुरू आहे. दररोज दुपारी एकच्या सुमारास पडणाºया पावसाने सोमवारी मात्र विश्रांती घेतली होती. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी लावली.

Rain again after one day's rest in Satara | साताºयात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस

साताºयात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस

Next
ठळक मुद्देअचानक आलेल्या पावसामुळे ग्राहकांची पळापळ

सातारा : साताºयात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा रतीब सुरू आहे. दररोज दुपारी एकच्या सुमारास पडणाºया पावसाने सोमवारी मात्र विश्रांती घेतली होती. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी लावली.


दिवाळी सण काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे साताºयाची बाजारपेठ चांगलीच फुलली आहे. मोती चौक ते पाचशे एक पाटी चौक, राजवाडा परिसरातील पदपथावर रांगोळी, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीसाठी आले आहेत. त्यातच अचानक पाऊस झाल्याने विक्रेत्यांना वस्तूंचे नुकसान टाळण्यासाठी गडबड करून प्लास्टिक कागद अंथरावा लागला.


पावसाने सोमवारी विश्रांती घेतली होती. तसेच मंगळवारी सकाळपासून कडक ऊन पडले होते. त्यामुळे छत्री, रेनकोट न आणता खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची अचानक आलेल्या पावसामुळे पळापळ झाली.

Web Title: Rain again after one day's rest in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.