डीजेच्या तालावर सखींचा ‘रेन डान्स’
By admin | Published: March 30, 2015 10:46 PM2015-03-30T22:46:13+5:302015-03-31T00:20:53+5:30
रंगांची उधळण : ‘रंगात रंगूया... चला रंग खेळूया’ला प्रतिसाद
सातारा : ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने आयोजित ‘रंगात रंगूया... चला रंग खेळूया’ या कार्यक्रमाला सखी मंच सदस्या आणि महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. डीजेच्या तालावर सखींनी ‘रेन डान्स’ केला. सुमारे तीन तास रंगांची उधळण सुरू होती.
येथील हत्तीखाना शाळेच्या प्रांगणात ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने महिला आणि युवतींसाठी ‘रंगात रंगूया... चला रंग खेळूया’ या ‘रंगारंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिद्धी पवार, आशा साळुंखे, अश्विनी शिखरे, संगीता शर्मा, शमा बागवान, मनीषा भोसले, सुनीता कीर्दत, जुई साळुंखे, आर्या आवारे यांच्या उपस्थितीत झाले. दहावी-बारावी आणि स्कॉलरशीप परीक्षांमधून मोकळा श्वास घेतलेल्या सर्व युवती व महिलांसाठी ‘लोकमत संखी मंच’ने खास हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नैसर्गिक रंग वापरण्यात आले. सखींना ‘लोकमत’च्या वतीनेही रंग देण्यात आले होते. स्प्रिंकलर सिस्टीमद्वारे पाण्याचा वर्षाव केला जात होता. हिंदी-मराठी, रिमिक्स गाणी व डीजेच्या तालावर सखींनी ‘रेन डान्स’ केला. लहान मुली व वृद्धाही सहभागी झाल्या होत्या. आर्या आवारे हिने सादर केलेल्या ‘दिल है छोटासा’, ‘एक-दो-तीन’ या नृत्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)
कार्यक्रमाच्या मध्यंतरी कास हॉलिडेज रिसॉर्टतर्फे एका सखीला एक दिवसीय पॅकेज, इम्प्रेशन ब्युटीपार्लरतर्फे पाच सखींना फेशियल, आनंद कृषी पर्यटनतर्फे तीन सखींना शिवार सहल, सुर्वेज हॉटेलतर्फे दहा सखींना जेवण आणि एस. एस. एंटरप्रायजेस तर्फे दोन सखींना इलेक्ट्रिॉनिक इस्त्रीचा लकी ड्रॉ काढण्यात आला. जिजाऊ प्रतिष्ठानच्या सिद्धी पवार आणि कास हॉलिडे रिसॉर्टच्या सारिका जाधव यांच्या हस्ते हा ड्रॉ काढण्यात आला.