पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:33+5:302021-07-05T04:24:33+5:30

कऱ्हाड : पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गत काही दिवसांपूर्वी माॅन्सूनचा चांगला पाऊस झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची ...

Rain exposure | पावसाची उघडीप

पावसाची उघडीप

Next

कऱ्हाड : पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गत काही दिवसांपूर्वी माॅन्सूनचा चांगला पाऊस झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकून घेतली. सध्या पिकांच्या उगवणीचा कालावधी असून, पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यामुळे उगवण झालेली पिके होरपळून जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

दुभाजकावर वाळवण

कऱ्हाड : कऱ्हाड ते पाटण मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. विजयनगरपर्यंत दुभाजकात संरक्षक रेलिंग उभारण्यात आले आहे. मात्र, या रेलिंगवर स्थानिक ग्रामस्थांकडून कपडे वाळत टाकले जात आहेत. त्यामुळे रस्त्याला ओंगळवणे स्वरूप येत आहे. दुभाजकात कपड्यांचे वाळवण टाकणाऱ्यांना समज देणे गरजेचे बनले आहे.

झुडूपांचे साम्राज्य

कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गालगत झुडुपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वारूंजी फाट्यापासून वहागावपर्यंत ही परिस्थिती असून, या झुडुपांच्या फांद्या रस्त्यावर विस्तारल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. महामार्ग देखभाल विभागाने झुडुपांचा हा अडथळा हटविण्याची मागणी केली जात आहे.

धोकादायक गतिरोधक

कऱ्हाड : राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गावर ठिकठिकाणी धोकादायकरीत्या गतिरोधक उभारण्यात आले आहेत. गतिरोधकाची पूर्वसूचना देणारे फलकही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चालकांची फसगत होत असून वाहने आदळून अपघात तसेच नुकसान होत आहे. गोटे व खोडशीच्या हद्दीत असे धोकादायक गतिरोधक आहेत.

Web Title: Rain exposure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.