जून महिना सरला तरी पावसाची पाठ!
By admin | Published: July 1, 2017 06:05 PM2017-07-01T18:05:32+5:302017-07-01T18:05:32+5:30
पेरण्या खोळंबल्या : बावधनसह परिसरातील शेतकरी हतबल
आॅनलाईन लोकमत
बावधन (सातारा) , दि. 0१ यावषीर्चा जून महिना संपत आला तरी बावधन व परिसरात अजूनही समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतीची मशागत व पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत.
यावर्षी मान्सून वेळेत हजर होईल, अशी आशा असताना जिल्ह्यात मात्र उशिरा मान्सून सक्रिय झाला. मात्र, वाई तालुक्यात अनेक ठिकाणी अजूनही मान्सून सक्रिय न झाल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे.
काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने तेथील शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या; परंतु बावधन व परिसरात मान्सून पूर्व एकही एकही झाला नाही. त्यामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. यावर्षी जून महिना संपला तरी मान्सूनने हजेरी लावली नसल्याने बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मोठ्या किमतीची खते तसेच बी-बियाणे खरेदी केली असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
यावर्षी पाऊस लांबल्याने बावधन परिसरातील भात, ऊस, हळद सारख्या पिकालाही पाण्याची कमतरता जाणवत आहे. बावधन व परिसरातील खरिपाची पेरणी ही पूर्णत: पावसावर अवलंबून असून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
- राजेश कचरे,
शेतकरी